पुणे

अठरापगड जाती एकत्र आल्याशिवाय विठ्ठल पावणार नाही : अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा

यवत : लहानपणी गावात देवळाच्या भिंत्तीवर रंगवलेल्या चित्रात विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या अठरापगड जातीच्या संतांचे चित्र पाहिले होते. आज समाजात जातीपातीचे विष कालवले जात असताना त्या चित्राची आठवण होते. या अठरापगड जाती एकत्र आल्याशिवाय विठ्ठल पावणारच नाही, अशी भावना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलबन-डाळिंब (ता. दौंड) येथील विठ्ठलाची महापूजा खासदार डॉ. कोल्हे यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, अशोक पवार, सभापती ताराबाई देवकाते, वैशाली नागवडे, राजेंद्र कांचन, के. डी. कांचन, महादेव कांचन, पूनम दळवी, सुशांत दरेकर, नितीन दोरगे, तात्यासाहेब ताम्हाणे, तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी गणेश मोरे, अशोक फरगडे, एल. बी. कुंजीर, सरपंच वनिता धीवर उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, " यादव साम्राज्यानंतर महाराष्ट्रात प्रभावी राजा नव्हता. या काळात भागवत धर्माच्या भगव्या पताकांनी येथील लढवय्यांची मूठ आवळून ठेवली. या मुठीत जिजाऊ-शिवबाने अलगद तलवारी ठेवल्या आणि स्वराज्य उभे राहिले.

कुल म्हणाले, डॉ. कोल्हे यांनी अभिनेता म्हणून संभाजीराजे घराघरांत पोचविले. आता खासदार म्हणून ते घराघरांतील प्रश्न संसदेत पोचवतील.

माजी आमदार थोरात, पवार यांचेही या वेळी भाषण झाले. या वेळी देवस्थानला मदत करणाऱ्या दानशूर भाविकांचा खासदार कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एकादशीमुळे डाळिंबला जत्रेचे स्वरूप आले होते. देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी प्रास्ताविक केले. एल. बी. कुंजीर यांनी सूत्रसंचालन केले. शंकर कासेकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT