ATM sakal
पुणे

कासुर्डी : आयडीबीआय बॅंकेच्या एटीएम मधील रक्कम गायब

आयडीबीआय कासुर्डी शाखेचे व्यवस्थापक अशिषकुमार पंचानंद यांनी या विषयी आज यवत पोलीसांत तक्रार नोंदवली आहे.

हितेंद्र गद्रे

पुणे : कासुर्डी (ता. दौंड) येथील टोलनाका परिसरात असलेल्या आयडीबीआय बॅंकेच्या एटीएम मधील 11 लाख 58 हजार 300 रूपयांची रक्कम गायब झाल्याचे समोर आले आहे. दि. 14 ऑगस्ट पासून हे एटीएम तांत्रीक अडचणीमुळे बंद होते. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी काल प्रत्यक्ष पहाणी केल्यावर ही बाब लक्षात आली आहे. आयडीबीआय (IDBI) कासुर्डी शाखेचे व्यवस्थापक अशिषकुमार पंचानंद यांनी या विषयी आज यवत पोलीसांत तक्रार नोंदवली आहे.

पंचानंद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 17 ऑगस्ट रोजी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी सदर एटीएम मधून दि. 14 पासून पैसे निघत नसल्या बाबत सांगितले. त्यानुसार मुंबई येथील मुख्या कार्यालयात संपर्क केला. त्यावेळी संगणकाच्या मदतीने ही तांत्रिक अडचण दूर केली जाईल, असे सांगण्यात आले.

त्यानंतर दि. 21 रोजी मुख्य कार्यालयातून सांगितल्या प्रमाणे आपण प्रत्यक्ष एटीएम मशीन जवळ जाऊन सांगितल्या प्रमाणे प्रक्रिया करून पाहिली. मात्र तरी ही एटीएम मधून पैसे निघाले नाहीत. त्यानंतर दि. 23 रोजी मुख्य कार्यालयातून फोनवरून एटीएम मशीनच्या खालच्या बाजूस असलेला कप्पा उघडण्यास सांगितला. तसे करताना हा कप्पा अर्धवट उघडा असल्याचे लक्षात आले. पैसे ठेवण्याचा हा कप्पा रिकामा होता.

याबाबत मुख्य कार्यालयाशी संपर्क करून माहीती दिली. एटीएम मध्ये प्रत्यक्षात असलेल्या रोख रकमेची माहीती घेताना लक्षात आले की या कप्प्यात एकून 16 लाख 1 हजार 500 रूपये होते. त्यापैकी 4 लाख 43 हजार 200 रूपये ग्राहकांनी काढले होते. उर्वरीत 11 लाख 58 हजार 300 रूपयांवर कोणीतरी अज्ञाताने डल्ला मारला होता. हा प्रकार दि. 14 ते दि. 23 या दहा दिवसांमध्ये घडला असावा. या बाबत वरीष्ठांशी चर्चा करून आज (दि. 24) यवत पोलीसांत फिर्याद दिली आहे. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटना स्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक केशव वाबळे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT