पुणे

आधी आगामी रक्कम, मग मोफत सेवा

महेंद्र बडदे

पुणे - महिन्यातील एक दिवस मोफत सेवा द्यावयाची असेल, तर आगाऊ रक्कम द्या, असे पत्र पीएमपी प्रशासनाने महापालिकेला पाठविले आहे, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने अद्याप यासंदर्भात प्रस्तावच मंजूर केला नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमाची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.

‘सकाळ’ने ‘बस डे’ आयोजित केल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढविण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका पातळीवर पावले उचलली गेली होती; पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने यासंदर्भात ऑक्‍टोबर २०१६ मध्ये ठराव मंजूर केला होता. डिसेंबर २०१६ मध्ये मुख्य सभेने या ठरावाला मंजुरी दिली होती. शहरात खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर कमी करून पीएमपी बसमधून प्रवास करावा, यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मोफत बस प्रवास सुविधा द्यावी आणि हा खर्च तुटीमध्ये समाविष्ट करावा, असा निर्णय घेण्यात आला होता. या ठरावानुसार पुणे महापालिकेने पीएमपी प्रशासनाला पत्र पाठविले होते. अद्याप यावर अंमलबजावणी झाली नाही. 

याबाबत काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांनीही पाठपुरावा केला होता. पीएमपी प्रशासनाने यासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांना एक पत्र पाठविले आहे. पीएमपीची सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात दिली जाते; पुणे महापालिकेने मोफत प्रवासाचा ठराव मंजूर केला असला तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठराव केलेला नाही. त्यांनीदेखील हा ठराव मंजूर करणे आवश्‍यक आहे. त्या दिवसाचा खर्च तुटीमध्ये समाविष्ट न करता ही रक्कम महामंडळाला आगाऊ उपलब्ध करून द्यावी. यामुळे पीएमपीच्या कारभारात आर्थिक अडचण येणार नाही. त्यामुळे तुटीचा भार महापालिकेने उचलावा, त्यास मान्यता घ्यावी, असे पीएमपीने नमूद केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Credit Card: शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत कर्ज! कोणती बँक देते सर्वात स्वस्त कर्ज? पात्रता, व्याजदर आणि अर्जाची संपूर्ण माहिती

BAN vs CA XI : बांगलादेशचा संघ ५४ धावांत तंबूत! ऑस्ट्रेलियन Campbell Thompson ने घेतल्या ८ विकेट्स; कसोटी मॅच डावाने जिंकली

Ichalkaranji Firing Incident : कबनूरमध्ये रील बनवणं बेतलं जीवावर! हवेत फैरी झाडताना गोळी थेट कवटीत घुसली, रक्तबंबाळ होऊन नीलेश जागीच कोसळला

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये FDAची मोठी कारवाई! ५ उद्योगांवर धाड; १,९४,५०,९२२ किंमतीचे तेल जप्त

मुंबईत भररस्त्यात बर्थडेचा धिंगाणा! बोनेटवर केक कटिंग अन् एअरगनने गोळीबार, भाजप कार्यकर्त्यासह १० जणांना अटक; Video Viral

SCROLL FOR NEXT