पुणे

आंतरमशागतीला वेग

CD

आंतरमशागतीला वेग; मजुरीचे दर वाढले

एका एकरासाठी दोन हजारांपर्यंत खर्च; मजूर आणि बैलजोडीची टंचाई

ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : खरीप पिकांची आंतरमशागत सध्या वेगाने सुरू झाली असली तरी अमरावती तालुक्यात मजूर आणि बैलजोडीची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. वेळेत मशागत करून घेण्यासाठी अधिक मजुरी देण्याची तयारी शेतकऱ्यांकडून केली जात असून, यंदा आंतरमशागतीच्या दरात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या निविष्ठांच्या खर्चात मजुरीचीही भर पडल्याने उत्पादन खर्चाचे गणित बिघडले आहे.
कपाशी, सोयाबीनसह अन्य खरीप पिकांमध्ये गवत वाढल्याने खुरपणी, निंदणी, डवरणी, फवारणी आदी कामांना वेग आला आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना वेळेत कामे करून घेणे कठीण झाले आहे. सध्या बैलजोडीसह एक एकर कपाशीची डवरणी करण्यासाठी सुमारे १,६०० ते २,००० रुपये खर्च येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा खर्च वाढला आहे. वेळेत डवरणी अथवा तण नियंत्रण न झाल्यास पिकांमध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.अमरावती तालुक्यातील अनेक गावांमध्ये महिला मजुरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अधिक पैसे देण्याची तयारी असूनही मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे. काही ठिकाणी मशागतीच्या कामासाठी मजुरांना आगाऊ रक्कम देण्याची वेळही शेतकऱ्यांवर आली आहे. मजुरीसोबतच रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या दरातही वाढ झाल्याने उत्पादन खर्च आणखी वाढला आहे. मजूर उपलब्ध नसल्याने काही शेतकरी तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा पर्याय स्वीकारत आहेत. मात्र, त्यासाठीही अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

शेतीमालाला योग्य भाव द्यावा
‘‘खते, कीटकनाशके आणि मजुरीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्या तुलनेत शेतमालाला मिळणारा भाव समाधानकारक नसल्याने उत्पादन खर्चाचा ताळमेळ बिघडला आहे. शासनाने उत्पादन खर्चाचा विचार करून शेतमालाला योग्य भाव आणि आवश्यक सवलती द्याव्यात,’’ अशी मागणी सावर्डी येथील माजी सरपंच राहुल उके यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं? संजय राऊतांना जिंकण्याचा विश्वास, म्हणाले...

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय घडलं?

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Vastu Tips: पाकिटात काय ठेवावे आणि काय ठेवू नये? वास्तुशास्त्राचे 'हे' उपाय दूर करू शकतात पैशांची अडचण!

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

SCROLL FOR NEXT