पुणे

मराठी माध्यमाच्या शाळेत संस्कारक्षम विद्यार्थी घडतात

CD

मराठी शाळांत घडताहेत संस्कारक्षम विद्यार्थी

दत्तात्रय बांदल; अमृतवाडी प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

भुईंज, ता. ५ : इंग्रजी माध्यमांच्या शाळांपेक्षा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये संस्कारक्षम विद्यार्थी तयार होतो. ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक यांमध्ये समन्वय असल्यास मराठी शाळा दर्जेदार शिक्षण देणाऱ्या ठरतात, असे मत कैलास फूड्स उद्योगाचे दत्तात्रय बांदल यांनी व्यक्त केले.
अमृतवाडी (ता. वाई) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उद्योजक दत्तात्रय बांदल यांच्या दातृत्वातून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे व ‘हॅन्डवॉश स्टेशन’चे भूमिपूजन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी श्री. बांदल बोलत होते.
शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात झाला. या मेळाव्यास शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंतचे विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून निवृत्त मुख्याध्यापक चा. रा. कुंभार, प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक प्रकाश काटवटे उपस्थित होते.
श्री. बांदल म्हणाले, ‘‘सर्वाच्या सहकार्याने मराठी शाळांचा विकास होणे गरजेचे असून, अन्य माजी विद्यार्थ्यांनी मराठी शाळेच्या प्रगतीसाठी देऊ केलेल्या योगदान आदर्शवत आहे.’’
शिक्षिका शारदा काकडे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापिका जयश्री गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांनी शाळेस संगणक दिला. श्री. बांदल यांनी पिण्याच्या पाण्याची टाकी व हँडवॉश स्टेशन बांधकामाचा प्रारंभ केला.
शाळेच्या शिक्षिका मोहिणी माने यांनी आभार मानले. मेळाव्यास नीलेश बांदल, सुनीता इंगवले, आशालता इंगवले, कलाबाई चोरगे, रेश्मा सावंत, राणी शेडगे, राणी जाधव, शशिकांत पार्टे, महादेव पाटील, नितीन शिर्के, प्रवीण निकम उपस्थित होते.

----------------------------

01400
अमृतवाडी : पिण्याच्या पाण्याची टाकी व हॅन्डवॉश स्टेशन बांधकामाचा प्रारंभ करताना दत्तात्रय बांदल. त्या वेळी मुख्याध्यापक, शिक्षक व माजी विद्यार्थी.

----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Latest Marathi News Live Update : कोराडी थर्मल पॉवर स्टेशनमध्ये अपघात; गरम वाफेच्या झळीत चार कर्मचारी भाजले

सूर्यकुमार यादवचं 'Olympics Gold' लक्ष्य; गौतम गंभीरचे धक्कादायक विधान, भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी गोष्ट

सिग्नल तोडला अन् पूजा सावंतला पोलिसांनी पकडलं; आयडीवरचं आडनाव वाचताच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT