GPRS Device Blast sakal
पुणे

GPRS Device Blast : चार्जिंगला लावलेल्या जीपीआरएस ट्रॅकिंग डिवाइसचा स्फोट; मनपा सफाई सेवकांमध्ये भीतीचे वातावरण

महानगरपालिका प्रशासनाने जीपीआरएस ट्रैकिंग डिवाइस मनपातील घनकचरा विभाग व आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणीतील सेवकांकरिता दिले आहे.

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेट - दैनंदिन कामकाज करण्यासाठी सेवक वेळेवर कामावर येतो की नाही, तसेच नेमून दिलेल्या वेळेत त्याचे काम पूर्ण करतो की नाही, यावर सर्व गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने जीपीआरएस ट्रैकिंग डिवाइस मनपातील घनकचरा विभाग व आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणीतील सेवकांकरिता दिले आहे.

मात्र या डिवाइसचा स्फोट झाल्याने हे जीवघेणे ठरू शकते, असा दावा सेवकांनी केला आहे. त्यामुळे हे डिवाइस तात्काळ बंद करावे अशीही मागणी करण्यात येत आहे. मनपाने या डिवाइस करिता घनकचरा विभाग व 15 क्षेत्रीय कार्यालय करिता साडे 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे . यातून सुमारे अडीच कोटी रुपये निधी खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आरोग्य विभागातील झाडू हुद्द्यावर काम करणाऱ्या सेविका सुरेखा अनिल सोनवणे, राहणार नाना पेठ यांच्या राहत्या घरी पहाटे चारच्या सुमारास गॅलरीमध्ये डिवाइस चार्जिंगला लावले होते. अचानक डिवाइसचा स्फोट झाल्याने आगीने पेट घेतला. त्यामुळे घरामधील कुलर, दोन प्लास्टिकच्या खुर्च्या, दोन प्लास्टिक बकेट आणि एक मोबाईल हे पूर्णतः जळून खाक झाले.

त्यामुळे याघटनेमुळे क्षेत्रीय कार्यालयातील सर्व सेवकांमध्ये खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या डिवाइस चार्जिंगला लावण्यासाठीही सेवक घाबरत आहे.

या डिवाइस मध्ये अनेक त्रुटी आहेत. सुरक्षिततेचा विचार केला असता याचा काही उपयोग नाही. त्यामुळे सेवकांना दडपणाखाली काम करावे लागत असल्याने कार्यालयातील सर्व सफाई सेवकांनी लेखी पत्राद्वारे या डिवाइसला संपूर्ण विरोध केला आहे.

यावेळी सेविका सुरेखा अनिल सोनवणे यांनी लेखी पत्रकात माहिती देताना सांगितले की, गॅलरीमध्ये डिवाइस जेथे चार्जिंगसाठी लावला होता त्या ठिकाणी माझी मुलगी कोमल आणि जावई त्यांच्या दोन मुलांसह झोपले होते. आणि घरातील आतील खोलीमध्ये माझ्या कुटुंबातील एकूण आठ सदस्य झोपले होते.

पहाटे ४ वाजता पुणे महानगरपालिकेचे सेवक संतोष उमापे हे कामाला जाण्यासाठी उठले होते. त्यांना गॅलरीमध्ये लागलेली आग आणि आगीमुळे जळत असलेल्या प्लास्टिकचा काळाकुट्ट धूर दिसला, तसेच प्लास्टिक जळाल्याचा वासही तीव्रपणे येत होता. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आरडाओरडा करत पटकन घराचा दरवाजा जोरजोरात वाजवून घरातल्या लोकांना जागे केले.

आरडाओरड झाल्याने लगेचच वस्तीतील लोक तेथे जमा झाली. काही क्षणातच आग जास्त वाढली आणि त्यामध्ये जीपीआरएस ट्रैकिंग डिवाइसबरोबर एक कुलर, दोन खुर्च्या, दोन प्लास्टिक बकेट आणि एक मोबाईल पूर्णपणे जळून खाक झाले होते. सुदैवाने मनुष्यहानी टळली.

घरातील सदस्यांनी व आजूबाजूच्या लोकांनी मिळून पसरत चाललेली आग विझवली. महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) च्या वतीने क्षेत्रीय कार्यालयाचे सचिव संतोष चव्हाण व युनियनचे उपखजिनदार अनिल घाडगे यांनी घटनेची पाहणी केली.

यावेळी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या मनपा सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे म्हणाल्या की, सदर घटनेची माहिती जाणून घेतली आहे. याबाबत घटनेची पडताळणी करण्यासाठी चौकशी समिती तयार करण्याचे योजिले आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येतील असे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT