जीवन गौरव पुरस्काराने
आनंदराव सुतार सन्मानित
कास, ता. २६ ः वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा जोपासत कीर्तन, प्रवचन व हरिकथांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करणारे जावळी तालुक्यातील कुसुंबीचे सुपुत्र, कीर्तनकार आनंदराव सुतार यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. वडूज (वाकेश्वर) येथे भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम उत्साहात झाला.
त्यांच्या उल्लेखनीय आणि दीर्घकालीन कार्याबद्दल त्यांना सन्मानित केले. गेली अनेक दशके त्यांनी वारकरी संप्रदायातील संत परंपरेचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे अविरतपणे काम केले. कीर्तन, प्रवचनाच्या प्रभावी शैलीतून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, नैतिक मूल्यांची जपणूक, समाजातील एकात्मता यांचा सातत्याने प्रचार केला. त्यांच्या विचारप्रवर्तक संदेशांनी श्रोत्यांच्या मनावर ठसा उमटवला.
धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेत मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व पुष्पहार देऊन माजी आमदार दिलीप येळगावकर यांच्या हस्ते गौरविले. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. “हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, वारकरी परंपरेच्या मूल्यांचा आणि समाजप्रबोधनाच्या अखंड सेवाभावाचा गौरव असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
या सन्मानामुळे कुसुंबीसह जावळी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला गेला. ग्रामस्थ, वारकरी बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्री. सुतार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
B04635
वाकेश्वर ः आनंदराव सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना दिलीप येळगावकर. त्या वेळी आदी.
..............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.