पुणे

आमदारकीच्या कारकिर्दीबद्दल अनंत गाडगीळ म्हणतात...

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील वैद्यकीय क्षेत्राला आमदार निधीतून तीन वर्षांपूर्वीच दिलेल्या उपकरणांचा कोरोनाच्या काळात वापर झाला, पुणेकरांसाठी पीएमपीच्या बस उपलब्ध करून दिल्या, शिक्षण क्षेत्रासाठी अनेक सुधारणा सुचविता आल्या तसेच सततच्या पाठपुराव्यामुळे काही धोरणात्मक निर्णय  झाले, याबद्दल समाधान वाटते, असे मनोगत विधान परिषदेतील कॉंग्रेसचे मावळते आमदार अनंत गाडगीळ यांनी बुधवारी व्यक्त केले. 

गाडगीळ यांची विधान परिषदेतील कारकीर्द 15 जून रोजी संपुष्टात आली. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि सर्व वरिष्ठ नेत्यांनी टाकलेला विश्वास मी पूर्ण करू शकलो. गेल्या सहा वर्षांत विधान परिषदेत भाजप सरकारला वारंवार कोंडीत पकडले. स्मार्ट सिटीचा फोलपणा उघड केला. द्रुतगती मार्गातील घोटाळा, मंत्रालयातील डेब्रिसचा घोटाळा बाहेर काढला. तसेच विधान परिषदेत सुमारे 450 हून अधिक प्रश्न उपस्थित केले. त्यात पुण्याचे 50 प्रश्न होते, असेही गाडगीळ यांनी म्हटले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुण्या-मुंबईतील पायाभूत सुविधा, रिंग रोड, उच्च न्यायालयाचे खंडपीठ, उंच इमारतींची सुरक्षितता आदी प्रश्न उपस्थित केले. त्यातून लिफ्टला काचा बसविणे, पार्किंगमध्ये पाणी मुरण्यासाठी 30 टक्के जागा राखीव ठेवणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील राजगृह हे निवासस्थान फेरीवाला क्षेत्रातून मुक्त केले हे धोरणात्मक निर्णयही झाले. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुण्यातील लष्कराच्या रुग्णालयाला फिरते आयसीयु, व्हॅंटिलेटर, फॉवलर बेड दिले बोपोडीतील महापालिकेच्या आणि कॅंटोन्मेंटच्या नेत्र रुग्णालयाला काही उपकरणे दिली, महापालिकेला इन्फ्रारेड थर्मामीटर दिले, त्याचा कोरोनाच्या काळात खूप उपयोग झाला, ही समाधानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुण्याच्या प्रदूषण प्रश्नावर लवकरच बैठक होणार असून फर्ग्युसन रस्ता सुशोभिकरणाचीही दखल मोठ्या प्रमाणात घेतली गेली, असेही त्यांनी नमूद केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: 'चाहत्यांसाठी आधी धोनी अन् मग CSK, जडेजाही वैतागतो', चेन्नईच्याच माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS: राजस्थानचा सलग चौथा पराभव! कर्णधार सॅम करनच्या संयमी खेळीनं पंजाबला मिळवून दिला विजय

SCROLL FOR NEXT