kiran Gosavi Sakal
पुणे

...आणि किरण गोसावी काही मिनीटांच्या अंतराने निसटला !

उत्तर प्रदेशात दाखल झालेल्या पुणे पोलिसांना किरण गोसावीचा गुंगारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आर्यन खानमुळे चर्चेत आलेला पुणे पोलिसांचा फरारी आरोपी किरण गोसावीला पकडण्यासाठी पुणे पोलिस काही दिवसांपासून प्रयत्न करीत होते. अखेर सोमवारी रात्री पुणे पोलिसांचे पथक गोसावीच्या मागावर उत्तर प्रदेशात दाखलही झाले. पोलिस लखनऊमध्ये पोचले, गोसावीपासून अवघ्या काही मिनीटांच्या अंतरावर पोलिस पोचले, मात्र गोसावी तेथून निसटण्यात यशस्वी झाला. पुणे पोलिसांची दोन पथके गोसावीच्या मागावर आहेत.

अंमली पदार्थ प्रकरणी नार्केटीक्‍स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ताब्यात घेतलेल्या आर्यन खानला "एनसीबी' कार्यालयात आणणारा व त्याच्यासमवेत सेल्फी घेऊन किरण गोसावी चर्चेत आला. त्यानंतर गोसावीच्या अंरक्षकाचा व्हिडीओ प्रसारीत झाल्यापासून गोसावी बेपत्ता होता. दरम्यान, त्याने सोमवारी वृत्तवाहिन्यांशी फोनद्वारे संपर्क साधून आपण महाराष्ट्र पोलिसांऐवजी उत्तर प्रदेश पोलिसांपुढे शरण येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आगोदरच गोसावीच्या मागावर असलेल्या पुणे पोलिसांनी तत्काळ उत्तर प्रदेशमधील लखनऊ गाठले. गोसावीचा शोध घेत पोलिस उत्तर प्रदेशातील माडीओ पोलिस ठाण्याच्या परिसरात पोचले. मात्र गोसावीला पोलिसांची कुणकुण लागली. त्यानंतर तो तेथून पसार झाला. त्याने तेथून फत्तेपुर गाठले. अशी माहिती सुत्रांनी दिली.

गोसावी विरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. गोसावीवर 29 मे 2018 रोजी गुन्हा दाखल असून चिन्मय श्रीधर देशमुख (वय 22, रा.कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, गोसावीने हॉटेल मॅनेजमेंटच्या नावाखाली मलेशीया येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून तीन लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. तेव्हापासून पोलिसांनी गोसावीला फरारी घोषीत केले आहे. पुणे पोलिसांची दोन पथके गोसावीच्या मागावर असून ते त्याला लवकरच ताब्यात घेतील, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT