mayra.jpg 
पुणे

अन्‌ पोलिसांचा ताफा आला मुलीच्या वाढदिवसाला !

सकाळवृत्तसेवा

पुणे ः सोसायटीत पोलिसांचा ताफा आला, पण तो नेहमीप्रमाणे बंदोबस्तासाठी नव्हता, तर सोसायटीतील एका मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. वाढदिवसाला कोणीच न आल्यामुळे हिरमुसलेल्या चिमुकलीचा रुसवा काढून पोलिसांनी तिचा वाढदिवस साजरा केला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लावलेल्या लॉकडाउनच्या बंदोबस्ताचा ताण असतानाही पोलिसांनी वेळ काढून वाढदिवसाला उपस्थिती लावल्याने नागरिकांना पोलिसांच्या खाकी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन घडले.

टिंगरेनगर येथील तिरुपती कॅम्पस या सोसायटीतील पाच वर्षाच्या मायरा दहीकर हिच्या वाढदिवसाला कोणी मित्र-मैत्रिणी व नातेवाईक लोकडाउनमुळे येऊ शकणार नव्हते, त्यामुळे दरवर्षी जल्लोषात साजरा केला जाणारा वाढदिवस यंदा मात्र करता येणार नव्हता, यामुळे मायरा हिरमुसली होती. बंदोबस्तावर येणाऱ्या पोलिसांना या चिमुरडीने "पोलिस काका, तुम्ही माझ्या वाढदिवसाला याल का ?' अशी विचारणा केली. तिची आई राशी, वडील योगेंद्र दहीकर यांनीही तशी विनंती केली आणि एरव्ही कठोर भूमिका घेणारे पोलिस चिमुकलीच्या विनंतीमुळे भावुक झाले.

दरम्यान, पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांच्यासह विश्रांतवाडी पोलिस ठाण्यामधील पोलिस उपनिरीक्षक सोपान नरळे, हवालदार देविदास राऊत, शिपाई सुशांत रणावरे, नितीन साबळे, आनंद रासकर यांनी तिच्या घरी जाऊन अभीष्टचिंतन केले, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत सोसायटीच्या आवारात केक कापून मायराचा वाढदिवस दिमाखात साजरा केला. या प्रसंगी सोसायटीतील सर्व नागरिकांनी आपापल्या घराच्या गॅलरीमधून टाळ्या वाजवून मायराला शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishnaraj Mahadik Statement : शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांची दिशाभूल; भाजप प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिकांचा राजू शेट्टी, सतेज पाटलांवर निशाणा

Nagpur News: एनएचएआयकडून वीज वाहिनीचे नुकसान ;२२ हजार नागरिक उकाड्याने त्रस्‍त

CRPF Constable Recruitment 2026 Last Date : कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख, ९१९५ सरकारी नोकऱ्यांसाठी असा करा अर्ज

अर्रर्रर्र खतरनाक! 'देवमाणूस' मध्ये मोठा ट्विस्ट; गोपाळला वठणीवर आणायला 'ती' येतेय; कोण आहे ती? नेटकऱ्यांनी ओळखलं...

Mumbai Indians ला शेवटच्या सामन्याआधी मोठा धक्का! शतकवीर खेळाडूसह युवा ऑलराऊंडर IPL 2026 मधून बाहेर

SCROLL FOR NEXT