मानधनासाठी अंगणवाडी सेविकांचे राज्यमंत्री भरणेंकडे साकडे Sakal
पुणे

वालचंदनगर : मानधनासाठी अंगणवाडी सेविकांचे राज्यमंत्री भरणेंकडे साकडे

अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्‍न अधिवेशनामध्ये मांडण्याची राज्यमंत्री भरणे यांची ग्वाही

राजकुमार थाेरात

वालचंदनगर : राज्यातील अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्‍न तातडीने अधिवेशनात मांडून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

शुक्रवार (ता.११) रोजीच्या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद केली नसल्याने राज्यभरातील सेवकांची निराशा झाली असून अंगणवाडी सेविकांनी आज रविवार (ता.१३) रेाजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेवून त्यांना साकडे घातले. यावेळी अंगणवाडी सेविकांना भरणे यांना निवेदन दिले आहे. यावेळी अंगणवाडी सेविकांनी सांगितले की, गेल्या साडेचार वर्षात सेविकांच्या मानधनात कोणतीही वाढ झाली नाही.

सध्या महागाईचा भडका उडाला असून अंगणवाडी सेविकांना कुंटूबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे झाले आहे. महिला व बालविकास विभागाने मानधन वाढीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला असून आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आमचा मानधन वाढीचा प्रश्न मार्गी लावण्याचे साकडे राज्यमंत्री भरणे यांना घातले आहे. यावेळी भरणे यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविकांना रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांपेक्षा कमी मानधन दिले असून त्यांच्या मानधनामध्ये वाढ होणे गरजेचे आहे.

सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा करून अंगणवाडी सेविकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या प्रदेश महासचिव शुभा शमीम,प्रदेश उपाध्यक्षा रजनी पिसाळ,इंदापूर तालुका अध्यक्ष बकुळा शेंडे,उपाध्यक्ष सुदर्शना भुजबळ,खजिनदार सुनीता कदम उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT