पुणे

पेन्शन, ग्रॅच्युइटी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा हक्क आहे : आमदार तांबे

CD

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या
राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

‘आयटक’ आक्रमक; शासकीय दर्जा, पेन्शन, ‘ग्रॅच्युइटी’ची मागणी

सककराळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : ‘‘अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ‘ग्रॅच्युइटी’ लागू करावी, नियमित पेन्शन योजना सुरू करावी, आजारपणासह आवश्यक रजा मंजूर कराव्यात, तसेच सामाजिक सुरक्षेचे कवच द्यावे,’’ या मागण्यांसाठी राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या मेळाव्यात करण्यात आला. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘आयटक’च्या माध्यमातून व्यापक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘आयटक महाराष्ट्र’चे सरचिटणीस श्याम काळे यांनी दिला. राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेससोबत (आयटक) संलग्नता तसेच दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड एम. ए. पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन मेळावा शनिवारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात झाला. मेळाव्याचे उद्घाटन विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते झाले. अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, प्रत्येक अधिवेशनात चर्चा आणि आंदोलने होऊनही त्यांची सोडवणूक झालेली नाही, याबाबत तांबे यांनी खंत व्यक्त केली. अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, अंशकालीन स्त्री परिचर आणि पोषण आहार योजना कर्मचाऱ्यांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्याची ग्वाही त्यांनी दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार तीन ते सहा वर्षे वयोगटातील पूर्वप्राथमिक शिक्षण शालेय शिक्षण विभागाशी जोडले जात असल्याने अंगणवाडी सेविकांना शिक्षिकेचा दर्जा मिळायला हवा.‘पेन्शन’ आणि ‘ग्रॅच्युइटी’ हा त्यांचा हक्क असून, या लढ्यात आपण अंगणवाडी कर्मचाऱ्यांसोबत असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT