kidnapping  sakal
पुणे

Baramati Crime : पत्नीला पळवून नेल्याचा राग, अल्पवयीन भावाचे केले अपहरण; बारामती पोलिसांनी केली सुटका

पत्नीला पळवून नेल्याचा राग मनात धरून, त्याच्या अल्पवयीन भावाचे अपहरण केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एकास अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

बारामती - पत्नीला पळवून नेल्याचा राग मनात धरून, ज्या युवकाने पत्नीला पळवून नेले आहे त्याच्या अल्पवयीन भावाचे अपहरण केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एकास अटक केली.

जोपर्यंत माझ्या पत्नीला आणून सोडत नाही, तोपर्यंत तुझ्या भावाला सोडणार नाही, अशी धमकी संबंधित युवकाने दिली होती. या प्रकरणी आठ जुलै रोजी बारामती शहर पोलिसात अपहणाची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने दोन पथके तयार करून तपास सुरु केला होता.

वारंवार लोकेशन बदलून आरोपी हुलकावणी देण्याचा प्रयत्न करत होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे माग काढून सांगली जिल्ह्यातील खानापूर येथून आरोपीस ताब्यात घेऊन संबंधित अल्पवयीन मुलाची शिताफीने सुटका केली.

जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर, शहरचे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके व कुलदीप संकपाळ, फौजदार युवराज घोडके, पोलिस हवालदार यशवंत पवार, मोहंमद अंजर मोमीन, अंकुश दळवी यांनी ही कामगिरी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Update: बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद! कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

ऑक्टोबरमध्ये येणार १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार, पेट्रोलचा खर्च फक्त २५ रुपये लीटर; गडकरींचा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Aditya Thackeray : हे सरकार निर्दयी! आदित्य ठाकरे यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT