Pune News 
पुणे

Pune News: पत्नी घटस्फोट मागताच चिडलेल्या पतीने पेटवल्या गाड्या

पुण्यात एका व्यक्तीने पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिल्याने थेट गाड्या पेटवल्याची धक्कादायक घटना घडली

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात एका व्यक्तीने पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिली म्हणून थेट गाड्या पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अजब प्रकार कोंढवा भागात घडला आहे.(Angry husband sets cars on fire when wife asks for divorce pune)

टेरेन्स डॉमिनिक जॉन असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार सोमवारी पहाटे ५ वाजता घडला.

पीडितांना भरपाईची रक्कम वाढवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

आरोपी टेरेन्स आणि त्याची पत्नी यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी कोणतेही काम धंदा करत नव्हता म्हणून पत्नीने त्याच्या विरोधात घटस्फोटासाठी अर्ज दिला.

पत्नी सोबत राहायचे असल्यामुळे त्याने अनेक वेळा तिला घटस्फोट देऊ नको असे सांगितले तरी सुद्धा तिच्या पत्नीने अर्ज दाखल केला. घटस्फोटाच्या अर्जावरून चिडलेल्या जॉन ने पत्नीची दुचाकी जाळायचे ठरवले.

Dapoli Sai Resort scam: साई रिसॉर्ट प्रकरणात नवा ट्विस्ट; सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर आणखी एकाला अटक

यावेळी पार्किंग मध्ये असलेल्या इतर दुचाकिंसह परिसरातील चारचाकी, रिक्षा आणि इतर दुचाकी यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या.

पोलिसांनी टेरेन्स ला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : नितेश राणे मुंब्रामध्ये दाखल

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT