पुणे

लातूर व धाराशिव संक्षिप्त बातम्या

CD

वाढत्या उन्हात
पशुधनाची काळजी घ्या

लातूर : वाढत्या उन्हामुळे पशुधन त्रस्त होत असल्याने त्यांची योग्य काळजी घेण्याचे आवाहन कासार सिरसी (ता. निलंगा ) येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. निवृत्ती बेंबडे यांनी केले आहे. उन्हाळ्यात जनावरांना उष्माघाताचा धोका अधिक असल्याने त्यांना थंड गोठ्यात किंवा झाडाखाली सावलीच्या ठिकाणी बांधावे, गोठ्याच्या छतावर गवत किंवा पोते टाकून त्यावर पाणी मारावे, गोठ्यात हवा खेळती ठेवावी, जनावरांना दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ व थंड पाणी द्यावे, हिरवा व ताजा चारा द्यावा, उन्हातून आल्यावर लगेच पाणी पाजणे टाळावे, बैलांकडून सकाळच्या सत्रातच कामे करून घ्यावीत, जनावरांचे श्वास घेणे वेगाने होऊन तोंडातून लाळ गळत असेल किंवा जनावर अचानक कोसळले तर ते उष्मघाताचे लक्षण असू शकतात, अशावेळी जनावरांच्या अंगावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, म्हशींना उष्णतेचा अधिक त्रास होत असल्याने त्यांना पाण्यात बसू द्यावे किंवा दिवसातून दोन वेळा आंघोळ घालावे, असे आवाहन डॉ. बेंबडे यांनी केले.

सात प्रकल्पांतील
पाणीसाठा राखीव
धाराशिव : यंदा कमी पावसाच्या शक्यतेमुळे संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तुळजापूर,उमरगा आणि लोहारा तालुक्यातील सात पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव केला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. पाणीसाठा राखीव केलेल्या प्रकल्पांत सांगवी काटी (ता. तुळजापूर) येथील लघुपाटबंधारे प्रकल्प, आलूर (ता. उमरगा) येथील लघुपाटबंधारे प्रकल्प व कोराळ साठवण तलाव प्रकल्प, धानोरी (ता. लोहारा) येथील लघुपाटबंधारे प्रकल्प, लोहारा लघुपाटबंधारे प्रकल्प, हिप्परगा लघुपाटबंधारे प्रकल्प आणि माकणीगाव साठवण तलाव प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पातील पाणी उपसा रोखण्यासाठी पाटबंधारे विभाग व महसूल प्रशासनाकडून संयुक्त पातळीवर देखरेख ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पुजार यांनी दिले आहेत.

धाराशिवमध्ये प्रशिक्षण
शिबिरांना सुरुवात
धाराशिव : जिल्ह्यातील क्रीडापटूंना स्पर्धापूर्व सक्षम प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आर्चरी, जिम्नॅस्टीक्स व कबड्डी खेळांच्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठीअनुभवी मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्चरीसाठी शुभांगी रोकडे या मार्गदर्शक असून हे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था येथे पार होत आहे. जिम्नॅस्टीक्ससाठी डिंपल ठाकरे या मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून, हे प्रशिक्षण श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे होत आहे. कबड्डीसाठी विश्वास खंदारे हे मार्गदर्शक असून चिखली येथील गांधी विद्यालयात प्रशिक्षण होत आहे. जिल्ह्यातील खेळाडू व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT