animal care hospital Injured leopard admitted to Manik Doh shelter center for treatment pune marathi news sakal
पुणे

Pune News : जखमी बिबट्याची शोध मोहीम फत्ते: जखमी बिबट्या माणिक डोह येथील निवारा केंद्रात उपचारासाठी दाखल

पुणे नाशिक महामार्गावरून भरधाव वेगाने पुणे पुण्याकडे जाणाऱ्या मोटारीने आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याला धडक

रवींद्र पाटे

नारायणगाव : येथील पुणे नाशिक महामार्गावरून भरधाव वेगाने पुणे पुण्याकडे जाणाऱ्या मोटारीने आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याला धडक दिली. या अपघातात बिबट्याचा मनका फॅक्चर झाला. जखमी अवस्थेत बिबट्या पुढील दोन पायावर सुमारे अर्धा किलोमीटर फरफटत गेला.वनविभाग, रेस्क्यू टीमचे सदस्य, नारायणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने जखमी बिबट्याचा शोध घेतला.

सव्वा आठच्या सुमारास वनविभागाचे वैद्यकीय अधिकारी यांनी जखमी बिबट्याला बेशुद्ध केले. त्यानंतर बिबट्याला उपचारासाठी माणिक डोह येथील निवारा केंद्रात हालवण्यात आले. अंधार असतानाही सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर जखमी बिबट्याला वाचवण्याची शोध मोहीम फत्ते झाली.

आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास येथील पुणे नाशिक महामार्गावरील कुबोटा ट्रॅक्टर शोरूम जवळ अज्ञात वाहनाची धडक बिबट्याला बसली. मणक्याचा भाग फ्रॅक्चर झाल्याने बिबट्याचे मागील दोन पाय लुळे झाले.बिबट्या जखमी अवस्थेत पुढील दोन पायांवर फरफटत महामार्ग ओलांडून भोर यांच्या मोकळ्या शेतात उतरला.

ही माहिती समजतात वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वनपाल अनिता होले, वन कर्मचारी खंडू भुजबळ पोलीस पाटील आपदा मित्र सुशांत भुजबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार घटनास्थळी दाखल झाले. याबाबतची माहिती वनरक्षक पवार यांनी माणिक डोह निवारा केंद्रातील डॉ.चंदन, वनक्षेत्रपाल नितीन चव्हाण यांना दिली.

दरम्यानच्या काळात जखमी बिबट्या पुढील दोन पायावर फरफटत सुमारे अर्धा किलोमीटर शेतात गेला. बॅटरीच्या प्रकाश झोतात वनरक्षक पवार व रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी बिबट्याचा पाठलाग केला. दरम्यान आठ वाजण्याच्या सुमारास माणिक डोह निवारा केंद्रातील डॉ.चंदन, वनक्षेत्रपाल चव्हाण घटनास्थळी आले.

डॉ.चंदन यांनी बिबट्याला मोठ्या शिताफीने बेशुद्ध केले. सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास वाहनातून बिबट्याला उपचारासाठी माणिक डोह निवारा केंद्रात हलवण्यात आले. जखमी बिबट्याला वाचवण्याची शर्थिची मोहीम सुमारे सव्वा तासाच्या प्रयत्ना नंतर पार पडली. जखमी बिबट्या नर जातीचा असून पाच ते सहा वर्षाचा पूर्ण वाढ झालेला मजबूत बांधायचा आहे.

नारायणगाव भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सायंकाळी सात नंतर पुणे - नाशिक महामार्गाच्या परिसरात बिबटे सहज दिसून येतात. हा भाग म्हणजे खऱ्या अर्थाने नैसर्गिक बिबट सफारी झाली आहे. बिबट प्रश्न आमच्या हाताबाहेर गेला असल्याची कबुली वनविभागाचे कर्मचारी खाजगीत देत आहेत.

नारायणगाव ते वडगाव कांदळी दरम्यानच्या पुणे नाशिक महामार्गावरील सात किलोमीटर अंतरात वाहनाची धडक बसून मागील वर्षभरात दोन कोल्हे, एक तरस, सात बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वाढलेल्या बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT