Calf dies in attack wild animals in Kolhewadi sakal
पुणे

Pune News : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कोल्हेवाडीत वासराचा मृत्यू

खडकवासल्यातील नागरी वस्ती लगतची घटना परिसरात

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : किरकटवाडी- खडकवासला हद्दीच्या माळरानावर गोठ्यातील तीन वर्षाच्या वासराचा बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. किरकटवाडी-खडकवासला गावाच्या हद्दीवर उंच टेकडीच्या माळावर भाऊसाहेब मते या शेतकऱ्याचा गट नंबर ४५ मध्ये दुभत्या जनावरांचा कच्चे बांधकाम असलेला गोठा आहे.

त्यात जनावरे रोज बांधलेली असतात. शुक्रवारी रात्री बारानंतर ही घटना घडली असावी. असे नागरिकांनी सांगितले. गोठ्यात सकाळी पाहिले असता वासरू नव्हते. शेजारी पाहिले असता. वासरू मृत अवस्थेत होते. त्याच्या शरीरावर वन्य हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याच्या जखमा आहेत. त्याचे पाठीवरील मांस खाल्लेले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यावर वन विभागाच्या डोणजे परिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे कर्मचाऱ्यांसह पोचल्या. खडकवासला गावचे माजी सरपंच विजय कोल्हे व किरण सांगळे यांच्या उपस्थितीत हा पंचनामा करण्यात आला. त्या मृत वासराचा पंचनामा केल्यावर ते शवविच्छेदण्यास पाठविले आहे.

मी रोज रात्री तेथे झोपायला असतो. शुक्रवारी रात्री गेलो नाही तर वासरू जंगली प्राण्याने खाल्ले. प्राण्यांच्या हल्ल्यात वासरू मेले आहे. वन विभागाने येऊन पंचनामा केला. मला नुकसान भरपाई द्यावी.

-भाऊसाहेब मते, शेतकरी

माळरानावर ही घटना घडली आहे. चिखल अथवा माती नसल्याने पायाचे ठसे आढळले नाहीत. बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला असण्याची शक्यता आहे. हल्ल्यातील मृत वासरू तीन वर्षाचे आहे. गाय जातीचे आहे. गोठ्यातील अन्य जनावरांपेक्षा वासरू त्याच्या आवाक्यातील असल्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला ओढत गोठ्याबाहेर नेले. शेतकऱ्यांनी पक्के गोठे बांधावेत.

-वैशाली हाडवळे, डोणजे परिमंडळ अधिकारी, वन विभाग

या माळरानावर किरकटवाडी कोल्हेवाडी खडकवासला परिसरातील अनेक नागरिक सकाळी अंधार असताना चालायला जातात. दोन अडीच महिन्यांपूर्वी तरस दिसला होता. येथील दोन चार कुत्री देखील बेपत्ता आहेत. तरस किंवा बिबट्याने खाल्ली असावीत. त्यामुळे चालायला येणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी.

-विजय कोल्हे, माजी सरपंच खडकवासला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT