पुणे

सर्वधर्मीय सण-उत्सवांत ध्वनीप्रदूषण रोखा: ''अनिस''चे आवाहन

CD

PNE26W47412
सोलापूर : अंनिसच्या बैठकीला उपस्थित डॉ. अस्मिता बालगावकर, डॉ. अशोक कदम, डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, व्ही. डी. गायकवाड, आर. डी. गायकवाड आदी.
---
सर्वधर्मीय सण-उत्सवांतील
ध्वनिप्रदूषणावर कारवाई करा
नियम समान ठेवण्याची अंनिसची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : सर्वधर्मीय सण, उत्सव व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ध्वनिप्रदूषण नियम, २००० ची समान व कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) सोलापूर शाखेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना देण्यात येणार आहे.
उत्सव साजरे करताना नागरिकांचे आरोग्य आणि शांततेचा विचार होणे गरजेचे असल्याने लाऊडस्पीकर व डीजेच्या वापरासाठी पूर्वपरवानगी आणि निश्चित डेसिबल मर्यादेचे पालन बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायालयीन निर्देशानुसार ध्वनिप्रदूषणाचे नियम सर्वांसाठी समान असून, त्यांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजक व ध्वनियंत्रणा चालकांवर तातडीने कारवाई करावी, असेही अंनिसने म्हटले आहे.
नागरिकांकडून ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास पोलिसांनी त्वरित ध्वनी पातळी मोजून नियमबाह्य ध्वनिवर्धक बंद करावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर डॉ. अस्मिता बालगावकर, डॉ. अशोक कदम, डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, डॉ. राहुल पालके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : टीम इंडिया अफगाणिस्तानला घाबरलीय! माजी खेळाडूची निवड समितीवर टीका; म्हणाले, हताश होऊन उचललेले पाऊल...

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Marathi News Live Updates: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रितेश हांगे नावाच्या तरुणाला अटक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना बाप्पा पावणार! गणेशोत्सवात महिलांना मिळणार ३,०००? योजनेबाबत नवी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT