महिला दिन विशेष
PNE26W01615
बार्शी ः वासरची काळजी घेताना अंजली कोकणे.
गोसेवा-योगसेवेच्या माध्यमातून समाजसेवेचा ध्यास
बार्शीच्या अंजली कोकणे यांची वेगळी वाट; दुधाच्या विक्रीच्या उत्पन्नातून मुलांना मदत
सकाळ वृत्तसेवा
बार्शी, ता. ७ ः बार्शी येथील अंजली कोकणे यांनी वेगळी वाट निवडत मागील सात वर्षांपासून गोसेवा आणि योगसेवेचा वसा जपला आहे. देशी गोवंशाचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने त्यांनी बळेवाडी (ता. बार्शी) येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ ‘वटवृक्ष गोशाळा’ सुरू केली आहे. त्यांच्याकडे सध्या १७ हून अधिक मोठ्या गाई आणि साधारण १५ वासरे आहेत. गीर तसेच खिलार वंशाच्या अनेक गाईंचा त्या उत्तम प्रकारे सांभाळ करतात. बार्शी शहरातील सुमारे अडीचशेहून अधिक घरांपर्यंत त्या रास्त दरात गीर गायीचे दूध पुरवतात. तसेच गीर गायीच्या दुधापासून तयार केलेले पनीर, तूप आदी पदार्थही उपलब्ध करून देतात.
गोशाळेतील मिळणाऱ्या विविध उत्पादनांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून चारा व पाण्याचा खर्च वजा करून उरलेल्या रकमेतून त्या दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात मदत करतात. अंजली कोकणे या अनेक वर्षांपासून ‘अंबिका योग कुटीर’च्या माध्यमातून मोफत योग प्रशिक्षणही देत आहेत. गोसेवेची प्रेरणा त्यांना याच कार्यातून मिळाली असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या या कार्यात बार्शीतील रेवती आपटे, रंजिता अर्जुन आणि लीना कटके या मैत्रिणींचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.
कोट PNE26W01616
- सध्या सगळीकडेच भेसळीचा जमाना असल्याने समाजाला उत्तम पद्धतीचे दूध आणि पंचगव्य उत्पादने देण्यासाठी गोशाळेच्या माध्यमातून प्रयत्न असतो. या व्यवसायातून त्यांनी पाच कुटुंबांना रोजगारही उपलब्ध केला जातो.
- अंजली कोकणे, बार्शी
चौकट
पत्रिका छापून केले वासराचे नामकरण
काही दिवसांपूर्वीच त्यांनी गोशाळेतील वासराचे नामकरण मोठ्या प्रमाणात पत्रिका छापून केले होते. त्याला सुमारे २ हजार पाहुणे उपस्थित होते.
अनेक देशी उत्पादने
शेणापासून व गोमूत्रापासून ही त्यांची वटवृक्ष गोशाळा अनेक इतरही प्रॉडक्ट्स बनवते. ज्यामध्ये कुठलेही हानिकारक केमिकल्स नसतात. शेणापासून बनवलेले सुगंधी धूप, गोमूत्रापासून बनवलेले सुगंधी फ्लोअर क्लीनर, गायीच्या दुधातून अनेक औषधी वनस्पती टाकून बनवलेले डोक्याला लावायचे तेल, हेअर क्लींजर. तसेच देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, दिवे, शोभेच्या वस्तू, आणि दिवाळीसाठी उटणे अशा वस्तू येथे तयार केल्या जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.