पुणे

अंकिता पाटलांनी घेतली राज्यपालांची भेट; मांडल्या शेतकऱ्यांच्या मागण्या

संदेश शहा

इंदापूर : ''आपण उपस्थित केलेले सर्व प्रश्न नागरिकांच्या हिताचे असून आपण त्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून प्राधान्याने हे प्रश्न सोडवू'' अशी ग्वाही राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषद सदस्या व नवी दिल्ली इस्मा कायदेशीर समिती सहअध्यक्षा अंकिता पाटील यांनी दिली.

अंकिता पाटील यांनी पुणे येथे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली तसेच त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अंकिता पाटील यांनी राज्यपालांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नियुक्ती, अकरावी प्रवेश प्रक्रिया पारदर्शी करणे, इंजिनियरिंग व मेडिकल प्रवेशसंदर्भात पूर्व परीक्षांचे वेळापत्रक सुनिश्चित करून परीक्षा घेणे, संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे ग्रामीण, इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची सक्तीने केलीजाणारी वीजतोडणी थांबवावी अशी विनंती महामहिम राज्यपाल यांना अंकिता पाटील यांनी केली.

यावेळी अंकिता पाटील म्हणाल्या, ''शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज तोडणी मोहीम सुरु आहे. मात्र शेतकरी बांधव हे अजूनही कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. सध्या शेतकऱ्याकडे पैसे उपलब्ध होतील असे कोणतेही पीक शेतात नसल्याने शेतकरी वीज बिलाचे पैसे भरू शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने शेती पंपांची वीजतोडणी मोहीम त्वरित थांबवणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी हे वीज खंडित मोहिमेबद्दल गप्प आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याबाबत आपण लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली.

तसेच ''कोरोना व्हायरस डेल्टा प्लसचे पेशंट सापडत आहेत. काही भागात डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढत आहे. ग्रामीण भागात गरोदर महिलांना सकस आहार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मुलांच्या शिक्षणात अडचणी येत आहेत आदी विषयांवर'' यावेळी सविस्तर चर्चा झाल्याचे अंकिता पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Dispute: भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

Medha Kulkarni: ''मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पुढे बसू नका'', पुण्यात मेधा कुलकर्णींचा अपमान? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा, अभिमन्यू पवारांवर आरोप

Latest Marathi News Live Update : वादग्रस्त पवना धरण बंदिस्त पाईप लाईनचा अंतिम निर्णय येत्या 3 जुलै ला सुटणार : महेश लांडगे भाजपा आमदार

Pune: पाणीकपातीने सोसायट्यांचे बजेट कोलमडले; कात्रज-कोंढवा परिसरातील परिस्थिती गंभीर; देखभाल शुल्कात प्रतिमहिना लाखोंची वाढ

IND vs IRE 1st T20I: वैभव सूर्यवंशी पदार्पणात पाच मोठे विक्रम! पहिली धाव घेताच पराक्रम करणार; सचिनसह रोहितचा विक्रम मोडणार

SCROLL FOR NEXT