PNE26W49419
अंकुश पालवे यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार
राज्य शासनाकडून नगरच्या भूमिपुत्राचा गौरव
अहिल्यानगर, ता. १३ : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती अभियंता दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अहिल्यानगरचे भूमिपुत्र तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश अशोकराव पालवे यांना २०२५-२६ करिताचा मानाचा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पालवे यांनी १८ वर्षांच्या शासकीय सेवेत उत्कृष्ट रस्ते, पूल, इमारती तसेच विविध विकासकामांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गुणवत्ता, नियोजनबद्ध अंमलबजावणी व कमी कालावधीत विकासकामे पूर्ण करण्याची कार्यशैली यामुळे त्यांच्या कामाची शासनाने दखल घेतली आहे. जिल्ह्यात कार्यकारी अभियंता म्हणून काम करताना आठ वर्षांपासून रखडलेले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे काम विशेष प्रयत्न करून अवघ्या एका वर्षात पूर्ण केले. एडीबी अंतर्गत सिद्धटेक–कोर्टी रस्त्याच्या कामासाठी विशेष प्रयत्न करून कमी कालावधीत परवानगी मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या रस्त्याला राज्यातील ‘उत्कृष्ट रस्ता’ म्हणूनही गौरविण्यात आले आहे. अहिल्यानगर येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन व्हीआयपी शासकीय विश्रामगृह, मुख्य न्यायालयीन निवासस्थाने, महसूल भवन, पाथर्डी तहसील कार्यालय, कर्जत व जामखेड येथील शासकीय रुग्णालये व विश्रामगृह इमारती, पारनेर तालुका न्यायालय इमारत तसेच आदर्श गाव हिवरे बाजार येथील प्रशिक्षण संकुल टप्पा या कामांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कोरोनाच्या काळात १०० खाटांच्या तात्पुरत्या रुग्णालयाची उभारणी करण्यासाठीही त्यांनी विशेष योगदान दिले.
सध्या नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत असताना केवळ एका वर्षात किमान दहा मोठ्या इमारतींची कामे पूर्ण करण्यात आली. यापैकी पाच इमारती २६ जानेवारी २०२६ रोजी एकाच दिवशी हस्तांतरित करण्यात आल्या.
------------
चौकट
अन्य उपक्रमात कर्तृत्वाचा ठसा
नाशिक विभागाच्या ‘नमो महास्वयंरोजगार मेळाव्या’चे उत्कृष्ट नियोजन करून राज्यात सर्वात कमी खर्चामध्ये हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात त्यांचा सहभाग राहिला. सात्रळ येथे विश्वविक्रमामध्ये नोंद झालेल्या श्री गंगागिरी महाराज सप्ताहाच्या नियोजनातही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षकांचे संपर्कप्रमुख व समन्वयक अधिकारी म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.