Ramdas Athawale Sakal
पुणे

Ramdas Athawale : अण्णाभाऊंना 'भारतरत्न' मिळण्यासाठी मोदी-शहांशी चर्चा करणार

'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचे साहित्य, शाहिरी, कामगार चळवळीतील कार्य, वाटेगाव ते मुंबई, रशिया असा झालेला प्रवास अचंबित करणारा आहे.

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट - 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचे साहित्य, शाहिरी, कामगार चळवळीतील कार्य, वाटेगाव ते मुंबई, रशिया असा झालेला प्रवास अचंबित करणारा आहे. त्यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असून, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहे," असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिले.

अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त सारसबाग परिसरात मातंग समाज समन्वय समिती पुणे यांच्यातर्फे अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रसंगी आठवले यांच्या हस्ते पहिला 'स्वर्गीय हनुमंतराव साठे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार' रिपाइं नेते बाळासाहेब जानराव यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते भीमराव पाटोळे, 'रिपाइं'चे शहराध्यक्ष संजय सोनावणे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मातंग आघाडीचे वीरेन साठे, रवींद्र आरडे, प्रकाश वैराळ, दत्ता जाधव, राजाभाऊ दडे, जनार्दन वाघमारे, सचिन बगाडे, विकास सातारकर, प्रदीप कांबळे, सुनील खंडाळे, निलेश वाघमारे आदी उपस्थित होते. अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आठवले व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.

यापुढे आठवले म्हणाले, 'सामाजिक परिवर्तनाला साहित्यातून बळ देणारे अण्णाभाऊ साहित्यात क्रांती केली. त्यांनी लिहलेली लावणी, शाहीरी, गीते, कथा, कादंबरी आणि पुस्तके समाजाला दिशादर्शक आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊंच्या विचारांवर चालणारा हनुमंत साठे हा आमचा शिलेदार अकाली गेला. समाजाला बांधण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार सुरु झाला, याचा आनंद वाटतो, असेही आठवले यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणातील निकाल काही क्षणांत.. कोर्टात काय घडतंय? वाचा सर्व अपडेट्स

Palghar: पालघर बनणार चौथी मुंबई ! गेमचेंजर प्रकल्पांना गती येणार, कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Malware Alert : लॅपटॉप-कॉम्प्युटरवर WhatsApp वापरताय? CERT-In ने दिला गंभीर इशारा, 'हा' मेसेज बघताच बँक अकाउंट होईल रिकामं

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Shaktipeeth Highway : अदानी-अंबानींसाठी सुपीक जमीन जाणार? 'शक्तिपीठ' महामार्गावरून सांगलीतील शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हा परिषदेवर वाढला दबाव

SCROLL FOR NEXT