पुणे

बारामतीतील दोन अभ्यासकांची राज्य समितीत निवड

CD

सोमेश्वरनगर, ता. ७ : राज्य सरकारच्या वतीने ''साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती''चे पुनर्घटन करण्यात आले आहे. यामध्ये बारामती तालुक्यातील डॉ. देविदास वायदंडे व निवृत्त मुख्याध्यापक सोपान खुडे या दोन अभ्यासकांची समितीत निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य तळागाळात पोहोचविण्यासाठी अभ्यास समितीची तीन वर्षांसाठी रचना करण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातून २७ जणांची समितीत वर्णी लागली आहे. यामध्ये मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे व कोऱ्हाळे खुर्द येथील लेखक सोपान खुडे यांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. वायदंडे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरीच्या अंगाने विपुल संशोधन केलेले असून त्यांचा संशोधन ग्रंथही प्रसिद्ध आहे. तर खुडे यांनी पाच पुस्तकांचे लेखन केले आहे. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जनतेपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या दुर्मिळ, अपरिचित साहित्याचा शोध घेणे हे काम समिती करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: 'त्या' औषधाचं गूढ वाढलं! अशोक खरात प्रकरणात SIT कडून दोन डॉक्टरांची चौकशी

Wardha News: ‘स्मार्ट’ वर्ध्याचा चेहराच विद्रुप; जागोजागी अवैध पोस्टरबाजी; लाखोंचा महसूल बुडाला

CM Meeting Decision Gokul Dudh: ‘गोकुळ’दूध संघावर प्रशासक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय, प्रशासक म्हणून यांची होणार नियुक्ती

Washim News: कारंजा तालुक्यात सूर्याचा प्रकोप; तापमान ४३ अंशांवर; काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात कणेरीवाडीत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT