पुणे

अण्णाभाऊंच्या जीवनकार्यावर आंतरराष्ट्रीय मंथन

CD

अण्णाभाऊंच्या जीवनकार्यावर
सोमवारी आंतरराष्ट्रीय मंथन
देश-विदेशातील अभ्यासक मांडणार विचार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २४ : वसुंधरा कला महाविद्यालय, जुळे सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. ३१) ‘साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे : जीवन व कार्य’ या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
अण्णाभाऊंयांच्या साहित्य, विचार व सामाजिक कार्याचा जागतिक संदर्भातून अभ्यास करण्यासाठी हे परिषद होणार आहे. शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होईल. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी असतील. अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठाच्या प्रा. फेय व्ही. हॅरिसन बीजभाषण ऑनलाइन करतील. संस्थेचे सचिव अभिजित ढोबळे, अध्यक्ष अब्राहम आवळे व प्राचार्य डॉ. दिगंबर झोंबाडे उपस्थित राहणार आहेत.
चारसत्रात होणाऱ्या परिषदेत मानवतावाद, अण्णाभाऊंचे विविधांगी चिंतन आणि चित्रपटसृष्टीतील योगदान या विषयांवर अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. चौथ्या सत्रात खुले चर्चासत्र होणार असून संशोधक शोधनिबंध सादर करतील. अण्णाभाऊंचे पुरोगामी साहित्य, लोककला आणि सामाजिक विचार जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने ही परिषद होत आहे. प्राध्यापक, संशोधक, लेखक, विचारवंत, विद्यार्थी व साहित्यप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; खात्यात पोहोचले हजारो कोटी

आनंदाची बातमी! पुण्यात १३ लाखांत मिळणार घर, म्हाडाकडून ४४६२ घरांसाठी लॉटरी जाहीर

Pune Crime: विमा योजना संपली, पैसे मिळणार सांगून गंडा; वाघोलीतील व्यक्तीला ४० लाखांचा ऑनलाइन चुना

Ujani Water: उजनीचे पाणी वाया, बोराळे नंदूरचे तलाव कोरडे! शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संताप, कार्यालयात ठिय्या

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

SCROLL FOR NEXT