अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव विविध उपक्रमांनी सुरू SAKAL
पुणे

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव विविध उपक्रमांनी सुरू

चित्रपट निर्माते व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले

कृष्णकांत कोबल ------------------------

हडपसर : ज्ञानज्योत रॅली, रक्तदान शिबीर, कोरोना प्रबोधन पथनाट्य, चर्चासत्र आदी उपक्रमांनी येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

क्रेडाईचे अध्यक्ष सतीश मगर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानदसचिव संदीप कदम, आमदार चेतन तुपे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी उपमहापौर निलेश मगर, राष्ट्रीय सेवा योजना राज्य संपर्क अधिकारी व विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, संस्थेचे खजिनदार मोहनराव देशमुख, सहसचिव ए. एम. जाधव, उपसचिव एल.एम.पवार, माजी प्राचार्य महादेव वाल्हेर आदी यावेळी उपस्थित होते.

दिग्दर्शक मंजुळे म्हणाले, "ज्ञान आणि भाषा यांबाबत समाजात असलेल्या गोंधळामुळे मराठीला कमी लेखले जात आहे. मात्र, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मगर महाविद्यालयाने ग्रामीण भागाच्या शैक्षणिक विकासात जे काम केले आहे, ते पाहिल्यावर हा गोंधळ कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आज महाविद्यालयाचे अनेक गरीब विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत आहेत. त्यादृष्टीने हा सुवर्ण महोत्सव महत्वपूर्ण आहे."

प्राचार्य डॉ. पंडित शेळके म्हणाले, "हडपसर हे

शहरातील वेगाने विकसित झालेले उपनगर असून या परिसराच्या सामाजिक ,सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासात मगर महाविद्यालयाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. १९७१ ला अण्णासाहेब मगर यांच्या प्रयत्नाने व अनेक दानशूर व्यक्तींच्या देणग्यांतून सुरू झालेले हे महाविद्यालय आज आजी माजी विद्यार्थ्यांच्या कर्तबगारीने नावारूपाला आले आहे. विविध विषयांच्या पीएच.डी . संशोधन केंद्रासह अद्ययावत उच्च शिक्षणाच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे.'

उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. अनंत माने, अनिल जगताप, काकासाहेब थोरात, प्रभारी अधिक्षक धनंजय बागडे, प्रा. नितीन लगड यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

मला आजही महागड्याच.... मोहसीनने दुसऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरने मारला टोमणा; पोस्ट करत म्हणाली

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT