exam sakal
पुणे

केंद्रीय विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची घोषणा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येत आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशभरातील केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची (सीयुईटी) घोषणा करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या या प्रवेश परीक्षेला अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ मे २०२२पर्यंत आहे.

विविध राज्यांत स्थित केंद्रीय विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येत असून, राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यापीठांत प्रवेशासाठी सामाईक संधी प्राप्त झाली आहे. इंग्रजी, हिंदी, मराठीसह १३ भाषांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असून, ही परीक्षा संगणकावर पार पडणार आहे.

परीक्षेविषयी महत्त्वाचे

  • परीक्षेची तारीख : जुलैचा पहिला किंवा दुसरा आठवडा

  • पद्धत : संगणकावर बहू पर्यायी प्रश्नोत्तर

  • देशभरातील परीक्षा केंद्रे : १५७

  • देशाबाहेरील परीक्षा केंद्रे : १३

  • संकेतस्थळ :https://cuet.samarth.ac.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थ्यांचा निर्लज्जपणे राजकारणासाठी वापर, धर्मेंद्र प्रधान यांची राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका

Delhi Police DCP Sandeep Lamba : पोलिसांनी मुलींवर कानाखाली मारणे कायद्यात बसतं का?, डीसीपी संदीप लांबांनी तरूणीला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांनी घेरलं

Live Updates Marathi : दिल्लीतील जंतरमंतरवर भर पावसात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

Pune Rain: धरणसाखळीला पावसाचा जबरदस्त बूस्ट! अवघ्या २४ तासांत १,३८० एमसीएफटी पाण्याची आवक, साठा ७३% वर

Priyanka Gandhi: ‘आंदोलन दडपण्याचा सरकारला अधिकार नाही’; सुटकेनंतर प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT