corona
corona 
पुणे

शिरूरमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येचा विस्फोट 

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) :  कोरोनाच्या कमी रूग्णसंख्येमुळे काल दिलासा मिळालेल्या शिरूरकरांना आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसला. आज शिरूर तालुक्यातील रूग्णसंख्येचा स्फोट होऊन दिवसभरात ५१ जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही हादरली.

शिरूर तालुक्यातील गेल्या आठ दिवसांतील रूग्णांच्या संपर्कातील ८४ जणांच्या स्वॅबचे नमूने काल तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यात ५१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली. यात शिक्रापुरातील सर्वाधिक बारा रूग्णांचा समावेश असून, तळेगाव ढमढेरे व शिरूर ग्रामीण परिसरात प्रत्येकी सात रूग्ण सापडले. त्याखालोखाल तर्डोबाची वाडी येथे चार बाधित सापडले असून, कोरेगाव भीमा व मलठण येथे प्रत्येकी तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मांडवगण फराटा, सणसवाडी, धानोरे व कारेगाव येथील प्रत्येकी दोघांचा; तर धामारी, करंदी व पिंपरी दुमाला येथील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

शिरूर शहरात दिवसभरात सहाजणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, त्यात सैनिक सोसायटीतील एका ६५ वर्षीय पुरूषाचा आणि ६३ वर्षीय महिलेचा समावेश आहे.  भाजीबाजारातील २४ वर्षीय युवक आणि ७२ वर्षीय नागरिकाला बाधा झाली असून, मारूती आळीतील साठ वर्षीय ज्येष्ठाचा आणि हुडको वसाहतीतील ९२ वर्षीय नागरिकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पाटील यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील बाधितांची संख्या कमी असली, तरी आता नव्याने एकाच कुटुंबातील इतरांना बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाधित रुग्णाला गृहविलगीकरणात ठेवण्याबाबत नगर परिषद प्रशासन फेरविचार करीत आहे. बाधित व्यक्तीला आता होमक्वारंटाइन न ठेवता थेट कोवीड केअर सेंटरमध्ये किंवा शासकीय रूग्णालयात ठेवले जाणार असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. 

दरम्यान, शहरात गेल्या दोन दिवसांत दोघा ज्येष्ठ नागरिकांचे मृ्त्यू झाले असले; तरी त्यांची कोरोना तपासणी झाली नव्हती. पण, या दोन्ही मृतांमध्ये कोरोनासदृष लक्षणे होती, अशी माहिती समजली असून, संबंधितांच्या कुटुंबीय व नातेवाईकांचे स्वॅब टेस्ट केले जातील, असे मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले. शहरात बाधित किंवा लक्षणे असलेले रूग्ण शोधण्यावर नगर परिषद प्रशासनाने भर दिला असून, नागरिकांनीही आपल्या शेजारी किंवा परिसरात संशयित रुग्ण असल्यास तातडीने नगर परिषदेला कळवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT