Another accused arrested in Kiran dole murder case in Katraj Pune 
पुणे

कात्रजमधील सराईताच्या खुनप्रकरणी आणखी एका आरोपीस अटक

पांडुरंग सरोदे

पुणे : कात्रज परिसरात सराईत गुन्हेगाराच्या खुनप्रकरणामध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री आणखी एका आरोपीला अटक केली. यापुर्वी एका आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली होती. खुनाचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला होता. 

किरण डोळे असे खून झालेल्याचे नाव आहे. प्रतिक उर्फ भैय्या सूर्यकांत डाकले (वय 21, रा.सच्चाई माता मंदिर जवळ, कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापुर्वी ओंकार संजय जोरी (रा. दुगड चाळ, कात्रज) यास अटक केली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार असलेल्या किरण डोळे यास पोलिसांनी दोन वर्षांपुर्वी तडीपार केले होते. डोळे हा त्याची पत्नी, आई व वडीलांसमवेत कात्रजमधील आगम मंदिर टेकडी परिसरात वास्तव्य करत होता. तर त्याच परिसरात राहणाऱ्या ओंकार जोरी, समीर जोरी, गजानन पासलकर, प्रतिक डाकले यांच्या घरी किरणचे येणे-जाणे सुरू होते. किरण 16 ऑगस्टला संध्याकाळी जोरीच्या घरी जाऊन येतो, असे सांगून किरण घरातुन गेला. त्यानंतर तो माघारी परतला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांन जोरी राहात असलेल्या घराच्या आवारातच किरणचा मृतदेह पोत्यात भरुन जमीनीमध्ये पुरल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सुत्रे हलवून ओंकार जोरी यास अटक केली. त्यावेळी किरणची व जोरी यांची दारु पिल्यानंतर भांडणे झाली होती. त्या कारणावरुन त्यांनी त्यास चाकूने व लोखंडी सळईने वार करुन त्याचा खुन केल्याची कबुली दिली होती. 

दरम्यान, या प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाकडून समांतर तपास सुरू होता. खुनाच्या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रतिक डाकले हा तळजाई झोपडपट्टी परिसरात येणार असल्याची खबर पोलिस कर्मचारी संतोष क्षीरसागर यांना मिळाली. त्यानुसार, त्यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचून त्यास अटक केली. डाकले हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT