Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एकाला अटक; ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी पैसे....

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे. अतुल घटकांबळे नावाच्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी पैसे पुरवल्याची माहिती आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये ससूनमधील फॉरेन्सिक २ डॉक्टरांना देखील अटक केलेली आहे. या प्रकरणाबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

अमित घटकांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. अमित वडगाव शेरीतून एका स्विफ्ट कारमधून 3 लाख रुपये घेऊन आला होता हे तपासातून उघड झाले आहे. अमित हा ससून रुग्णालयात शवविच्छेदन विभागात शिपाई म्हणून काम करतो. अतुल हा डॉक्टर अजय तावरे यांचा अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो.

3 लाख रुपये घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकले

कल्याणीनगर अपघाताप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. ससूनच्या दोन डॉक्टरांनी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याच्या म्हणण्यानुसार ब्लडचा रिपोर्ट बदलला असल्याचं समोर आलं आहे.

अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे ब्लड गोळा करण्यात आले होते, ते दुसऱ्या व्यक्तीचे होते. तेच ब्लड फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते. आरोपीचे ब्लड सॅम्पल ससूनच्या डॉक्टरांनी घेऊन ते डस्टबीनमध्ये फेकले. एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेतले आणि त्यावर आरोपीचे नाव लिहून तेच फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले, असा धक्कादायक खुलासा आयुक्तांनी केला आहे.

श्रीहरी हरलोर यांनी ब्लड सॅम्पल घेतले आणि रिप्लेस केले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. अजय तावरे याला देखील अटक करण्यात आली होती. तावरे याच्या आदेशानेच हरलोर याने काम केले आहे. आम्हाला शंका असल्याने आरोपीचे ब्लड सॅम्पल आम्ही औंधच्या हॉस्पिटलला देखील पाठवले होते, असं आयुक्त कुमार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT