पुणे

लोणावळ्यातील बहुचर्चित राहुल शेट्टी हत्येप्रकरणी हल्लेखोरासह एकास अटक

भाऊ म्हाळसकर

लोणावळा : लोणावळ्यातील बहुचर्चित राहुल उमेशभाई शेट्टी हत्या प्रकरणातील हल्लेखोरासह एकास पोलिसांनी अटक केली आहे. इब्राहीम युसूफ खान (वय-३०, रा. सैय्यदनगर, हडपसर, मूळ रा. शहावली मोहल्ला कब्रस्थानसमोर, लातूर) व मोहन उर्फ थापा देवबहाद्दुर मल्ला (वय-४७, रा. बॅटरीहिल, खंडाळा, मूळ रा. लुंबिनी, नेपाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. इब्राहीम खान याने शेट्टी यांच्यावर प्रत्यक्ष हल्ला केल्याचा संशय आहे. लोणावळा पोलिस उपविभागीय अधिकारी व साहय्यक पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी ही माहीती दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेट्टी हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या चार झाली असून अन्य तीन संशयीत फरारी आहे. शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष राहुल शेट्टी यांची सोमवारी (ता.२६) सकाळी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडत हत्या करण्यात आली होती. शेट्टी यांच्या पत्नी सौम्या शेट्टी यांनी फिर्याद दिली होती.

त्यानुसार सुरज आगरवाल ( वय-४२, रा. लोणावळा), दीपाली भिलारे (वय-३९, रा. लोणावळा) या दोघांना घटनेच्या दिवशीच पोलिसांनी अटक केली होती. तर अज्ञात हल्लेखोरासह मोबिन इनामदार (वय-३५, रा.भैरवनाथ नगर, कुसगाव लोणावळा),  कादर इनामदार (वय-३३, भांगरवाडी , लोणावळा),  सादिक बंगाली (वय-४४, गावठाण, लोणावळा) आदींवर गुन्हा दाखल झाला होता. हल्लेखोराचा माग काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

गुप्त बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे  माहीती घेत स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा शहरच्या कर्मचाऱ्यांनी शेट्टी यांचा हल्लेखोर इब्राहीम व मोहन मल्ला यास पुण्यातून अटक केली.  जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, सहायक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकातील पोलीस नाईक नितिन सुर्यवंशी, अमित ठोसर, वैभव सुरवसे, मनोज मोरे, राजेंद्र मदने, अजिज मेस्त्री, राहुल खैरे, पवन कराड यांच्या पथकाने ही हल्लेखोरास शिताफीने पकडले.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुण्यात सापळा लावत दोन्ही मुख्य आरोपी ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून हत्येच्या कारणांचा तपास सुरु असून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करावयाची असल्याचे श्री. काँवत म्हणाले. अत्यंत संवेदनशील अशा घटनेचा चोवीस तासात छडा लावत हल्लेखोरांना अटक केल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी तपास पथकास वीस हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले असल्याचे  काँवत म्हणाले. 

हत्येमागील राजकीय कारणांचाही शोध : मनोजकुमार यादव- शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आलेला मोहन मल्ला हा शिवसेनेचा शाखाप्रमुख राहीला आहे. तर दीपाली भिलारे हीने युवती सेनेचे तालुका संघटक पद भुषविले आहे. गुन्हा दाखल झालेल्यामंध्ये काही शिवसेना पक्षाशी संबधित आहे. मल्ला याने हत्येत सहभाग घेतला असल्याने राहुल शेट्टी यांच्या हत्येमागे काही राजकीय वैमनस्य आहे का? राजकीय व्यक्तींचा हात आहे का? या कारणांचाही पोलिस तपास करत आहेत अशी माहीती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांमध्ये फूट! मोठ्या पक्षाने ९ वर्षांची साथ सोडत युती तोडली; राजकीय गणित बिघडले

SCROLL FOR NEXT