Crime Sakal
पुणे

औंध येथील उद्योगपती गायकवाड पिता-पुत्रावर आणखी एक गुन्हा दाखल

औंधमधील उद्योजक गायकवाड पिता-पुत्रावर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात खासगी सावकारी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कौटुंबिक हिंसारासह फसवणूक, खंडणी, जीवे मारण्याची धमकी या स्वरुपाचे गुन्हे (Crime) दाखल असलेल्या औंधमधील उद्योजक (Businessman) गायकवाड पिता-पुत्रावर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात खासगी सावकारी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, तर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Police त्यांच्यावर यापुर्वीच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई केली आहे.

नानासाहेब शंकरराव गायकवाड, गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (दोघेही रा. औंध) यांच्यासह राजु अंकुश अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वप्निल गणपतराव बालवडकर (वय 36 रा. क्‍लोरीस रेसीडेन्सी, बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालवडकर हे व्यावसायिक आहेत. त्यांचे बुलेटचे शोरूम आहे. त्यांनी त्यांच्या व्यावसायासाठी 2016 ते मे 2017 या कालावधीमध्ये गायकवाड कुटुंबाकडून 2 कोटी रूपये दोन टक्के व्याजाने घेतले होते. तसेच 2017 मध्ये 1 कोटी रुपये 4 टक्के व्याजाने घेतले होते. त्यानंतर त्यांनी 2018 मध्ये 55 लाख 4 टक्के व्याजने दिले होते. तेव्हा त्यांनी व्याज जर वेळेवर दिले नाही, तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच फिर्यादी यांनी आरोपींच्या सांगण्यावरून आरोपीचा मित्र धनेश माळी यांच्या खात्यावर 1 कोटी 10 लाख व गायकवाड यांच्या घरी जाऊन 3 कोटी 40 लाख रूपये रोख स्वरूपात दिले होते. गायकवाड कडून व्याजाने घेतलेले पैसे फिर्यादींनी व्याजासह परत केले होते. असे असतानाही दोघांनी बालवडकर यांची आठ गुंठे जमीन स्वतःच्या नावे लिहून घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

गायकवाड पिता-पुत्राविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात त्यांच्या सुनेने कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर चंदनगर, चतुःशृंगी या पोलिस ठाण्यांसह पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्यांच्यावर "मोका'अंतर्गत कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT