Pune Rain News sakal
पुणे

Pune Rain News : पावसाचा दुसऱ्या दिवशीही तडाखा

येथील परिसराला शनिवारी (ता. ११) सायंकाळी पाच वाजता अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. या वादळात वाल्हे नजीक वरचामळा येथील पोल्ट्रीशेड, घरे तसेच गुरांच्या गोठ्यांची पत्रे उडून गेले तर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

वाल्हे : येथील परिसराला शनिवारी (ता. ११) सायंकाळी पाच वाजता अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. या वादळात वाल्हे नजीक वरचामळा येथील पोल्ट्रीशेड, घरे तसेच गुरांच्या गोठ्यांची पत्रे उडून गेले तर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यंदाच्या वर्षातील पहिल्याच वळवाच्या पावसाने झटका दिल्याने शेतकरी हवालदिल झाला असून झालेल्या नुकसानीचे शासनस्तरावरून तातडीने पंचनामे व्हावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी सरपंच अतुल गायकवाड यांनी केली आहे. वळिवाच्या या पावसाने वाल्हेसह आडाचीवाडी, वागदरवाडी, सुकलवाडी, राख, मांडकी, हरणी, दौंडज, पिसुर्टी या परिसराला जोरदार झोडपून काढले असून जवळपास एकतास झालेल्या वादळी पावसाने वित्त हानी झाली आहे.

तुरळक ठिकाणी गारा पडल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. तर या पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सायंकाळी सातनंतरही सुरळीत झालेला नव्हता. तर या वादळी पावसामुळे बऱ्याच दिवसांपासून तनाहनलेल्या शेतजमिनींना तळ्याचे स्वरूप आले होते. वरचामळा येथील सोनुबाई गणपत पवार यांच्या पाच हजार पक्षांच्या पोल्ट्रीचे शेडचे सिमेंटचे पत्रे उडून गेल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसला आहे.

सुदैवाने दोन दिवसांपूर्वी पोल्ट्रीतील पक्ष्यांचा लॉट गेल्याने होणारे संभाव्य लाखो रुपयांचे नुकसानमात्र टळले. दरम्यान सध्या त्यांच्या पोल्ट्रीमध्ये असलेल्या थोड्या कोंबड्या पावसाने भिजल्याने काही कोंबड्या दगावल्या असुन काही मरणावस्थेत असल्याचे नितीन पवार यांनी सांगितले. त्यांच्या शेजारील भाऊ मदने यांची नवीन लागवड केलेली अंजिराची झाडे जमीनदोस्त झाले. वाल्मिकवस्ती येथील भुजबळ यांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, राख (ता. पुरंदर) येथील एका घरावरील कौले गेले तर अविनाश पवार यांच्या घरात घुसल्याने त्यांचे नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Farjan Dordi : बाबा फर्जनच्या घरातून जप्त केली सव्वा पाच कोटींची 'माया'; पण ती मोजताना बँक कर्मचारी अन् पोलिसांची का झाली दमछाक? बंगल्यावर रायफल, 6 हजार काडतूसंही सापडली

Women Farmers success story: महिला शक्तीचा नवा आदर्श! वरखेडीतील महिला गटाने इस्रायली तंत्रज्ञानातून फुलवली आधुनिक शेती, गटशेतीची यशोगाथा..

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवारांना आम्ही सर्व गोष्टी सांगतो, अजितदादांसारखं ट्यूनिंग वहिनींसोबतही आहे - सुनील तटकरे

Hormuz Strait बंद, भारतात पुन्हा गॅस सिलिंडरचा तुटवडा होईल? | LPG, Petrol-Dieselवर नेमका काय परिणाम?

Nashik Crime: लाडकी बहीणच्या पैशातून दागिने घेण्याचं आमिष दाखवलं, महिलेला पळवून नेत अत्याचार; एकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT