Another patient with corona infection Found in Pimpri on Sunday 
पुणे

CoronaVirus : पिंपरीत कोरोना संसर्गाचा आणखी एक रुग्ण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : दुबई व जपानमधून सहा ते नऊ मार्च यादरम्यान शहरात आलेल्या नऊपैकी एका 31 वर्षीय व्यक्तीच्या घशातील नमुन्याचा अहवाल रविवारी (ता. 15) पॉझिटिव्ह आला. त्या व्यक्तीने 23 फेब्रुवारी ते तीन मार्च यादरम्यान जपान आणि दुबई येथे प्रवास केला. त्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. त्यांना वायसीएम व भोसरी रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात ठेवले असून, अन्य आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडले असल्याचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सांगितले.

सिंहगडावर पर्यटकांची संख्या रोडावली
 

शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 9 वर
वायसीएम व भोसरीतील रुग्णालयात रविवारपर्यंत 65 रुग्णांच्या घशातील नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासण्यात आले. त्यापैकी नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. 45 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडले आहे. अन्य अकरा जणांचा अहवाल प्रलंबित आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
नऊ जणांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व अन्य व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू असून, त्यांना घरातच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णांचे सर्वेक्षण करण्यासाठी 37 जलद प्रतिसाद गट कार्यान्वित केलेले आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT