corona1 
पुणे

शिरूर तालुक्यातील या गावातही सापडला कोरोना रुग्ण

दत्तात्रेय कदम

मांडवगण फराटा (पुणे) : शिरूर तालुक्यातील बाभूळसर बुद्रुक येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एक तरुण सापडला आहे. 

हा  कोरोनाबाधित तरुण कारेगाव औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत काम करीत आहे. तो बाभूळसर बुद्रुक येथून दररोज आपल्या कामाच्या ठिकाणी ये जा करीत होता. त्याचे अहवाल हे पॉझिटीव्ह आल्याने मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना होम क्वारंटाईन केले आहे. या तरुणावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबत मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा सातपुते यांनी सांगितले की, कोरोनाबाधित रुग्ण जरी सापडला असला, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफवा पसरू देऊ नका. तसेच, अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना, तसेच घराबाहेर पडताना सोशल डिस्टंसिंग यांचा अवलंब करत मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT