Corona-Test 
पुणे

पिंपरीत निजामुद्दीन प्रकरणातील आणखी एक पॉझिटिव्ह; शहरातील पाॅझिटिव्ह संख्या 21

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील आणखी एका व्यक्तीचा एनआयव्ही कडील अहवाल पाॅझिटीव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 21 झाली आहे. 

निजामुद्दीन येथील कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडमधील 23 नागरिक सहभागी झाले होते. त्यातील तिघांसह संपर्कात आलेल्या पाच जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील आणखी एकाचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला.

दरम्यान, बुधवारी 26 संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासण्यासाठी पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

महापालिका क्षेत्रात आजपर्यंत 21जण पाॅझिटीव्ह आढळले आहेत. त्यातील 12 जण बरे होऊन घरी पोहोचले आहेत. सध्या नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील तिघे निजामुद्दीन येथील कार्यक्रमास उपस्थित होते. तर, अन्य सहा जण त्यांच्या संपर्कातील आहेत. आजपर्यंत शहरातील एक हजार 873 व्यक्तींना घरातच क्वारनटाइन केलेले आहे. तर, 587 जणांचे नमुने एनआयव्हीकडे तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील 541 नमुने निगेटिव्ह आले आहेत. घरोघरी जाऊन सात लाख 47 हजार 249 व्यक्तींचे सर्वेक्षण केले आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : फडणवीस-शिंदे वेगळे लढणार! भाजपच्या मंत्र्यांनीच दिला मोठा इशारा

Thane News: कल्याणमध्ये मंगळवारी पाणीबाणी! ९ तास पाणीपुरवठा बंद

Dmart Sale : डीमार्ट तुम्हाला लुटतंय? DMart बाहेर आईस्क्रीम,पॉपकॉर्न विकणारे कोण असतात माहितीये? हे सिक्रेट पाहा नाहीतर खिसा होईल रिकामा

AI Career: AI मध्ये करिअर करायचंय? ऑस्ट्रेलियातील टॉप युनिव्हर्सिटीजची यादी येथे पहा!

Latest Marathi News Live Update : संत गोरोबाकाकाची पालखी पंढरीच्या कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ

SCROLL FOR NEXT