पुणे

संगमनेरात भोंदूगिरी विरोधी महिला परिषद!

CD

संगमनेरात भोंदूगिरी विरोधी महिला परिषद
संगमनेर, ता. १३ ः जागृत महिला मंच आणि लोकपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ‘भोंदूगिरी विरोधी महिला परिषद’ बुधवारी (ता. २०) सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत अकोले बायपास, संगमनेर येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. अंधश्रद्धा, जादूटोणा व भोंदूगिरीच्या विळख्यातून महिलांची मुक्तता व्हावी, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेस प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्यामसुंदर सोन्नर महाराज ‘संतांनी सांगितलेला वैज्ञानिक विचार’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ज्योती जाधव ‘भोंदू-बुवांच्या जाळ्यात महिला कशा अडकतात’ याविषयी विचार मांडणार आहेत, तसेच पुण्याचे विशाल विमल ‘भोंदूंच्या दुनियेतील जुगाड’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके ‘माध्यमे आणि अंधश्रद्धा’ या विषयावर, तर ॲड. रंजना गवांदे ‘भोंदूगिरी उघड करताना’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेत मांत्रिक, बुवाबाजी व अंगात येणे यामागील फसवेगिरी समजून घेणे, जादूटोणा विरोधी कायदा व पोलिस यंत्रणेची भूमिका, गावपातळीवर महिलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवावा, भोंदूगिरीचे थेट प्रात्यक्षिक व पर्दाफाश, तसेच शोषण व्यवस्थेतून मुक्तता आदी विषयांवर विशेष चर्चा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MITCHELL STARC: मिचेल स्टार्क-शोरिफुल इस्लामचा अनोखा पराक्रम; १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात दुसऱ्यांदा घडलं असं काही!

Marathi News Live Updates : मी पुण्यात भाषण द्यायला नाही, तुमचं म्हणणं ऐकायला आलो आहे- राहुल गांधी

Money Luck Horoscope: प्रचंड पैसा, लाखोंचं पॅकेज अन् मनासारखी नोकरी! १ सप्टेंबरपासून द्वि-द्वादश योग ‘या’ राशींचं नशीब पालटणार

Manchar News : तरुणांना रोजगाराच्या संधी! पुणे जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’साठी अर्ज करण्याची सोमवार (ता. ३१) ऑगस्टपर्यंत मुदत

एल निनोचं रौद्ररूप येणार? शंभर वर्षांतील शक्तिशाली घटनांपैकी एक ठरण्याचा अंदाज, भारतासह जगाची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT