पुणे

पुणे : रामभाऊ मोझे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवत खोटे कागदपत्र तयार करून महिला शिक्षिकेची बदनामी केल्याप्रकरणी माजी आमदार रामभाऊ मोझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश आर. यु. मालवणकर यांनी हा आदेश दिला.

योग्यता संदीप पठारे (रा. वडगाव शेरी) यांनी याबाबत जुलै 2017 साली लोणीकंद पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोझे, गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नितीन चंद्रकांत मोहीरे आणि संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या फार्मसी कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या होत्या. प्रसूती रजेनंतर त्यांनी पुन्हा कामावर रुजू करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांची पूर्वीच एका को-या लेटरपॅडवर तारखा न टाकता सह्या घेतल्या होत्या. त्याआधारे फिर्यादी यांना सप्टेंबर 2014 नंतर सेवा समाप्तीचे पत्र देण्यात येणार असल्याचे शासकीय कार्यालयांना दिले, असे फिर्यादीत नमूद आहे.

मोझे यांच्याविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असून, ते तपासात सहकार्य करीत नाहीत. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळावा असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

Loni Kalbhor Crime : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांकडून पतीवर केला जीवघेणा हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल

Velhe Crime : निगडेत कोयत्याच्या धाकावर जबरी चोरी; 5 लाख 67 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास

SCROLL FOR NEXT