antigen test kits sakal
पुणे

Antigen Kit Scam : ॲटीजेन कीट घोटाळ्याची चौकशी सप्टेंबरपासून सुरूच

कोरोना काळात नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी खरेदी केलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट कीटमध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे झालेली.

सकाळ वृत्तसेवा

कोरोना काळात नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी खरेदी केलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट कीटमध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे झालेली.

पुणे - कोरोना काळात नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी खरेदी केलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट कीटमध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे झालेली असताना त्याची सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेली चौकशी अद्यापही संपलेली नाही. मात्र, यावर आता सारवासारव करत येत्या आठड्याभरात अहवाल प्राप्त होईल असा दावा आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी केला आहे.

महापालिकेच्या वारजे येथील अरविंद बारटक्के दवाखान्यात जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत रॅपिड अँटीजेन टेस्ट कीट खासगी लॅबला विकल्याचा आरोप याच महापालिकेच्या एका निलंबित डॉक्टरकडून करण्यात आला. त्यासंदर्भात रीतसर वारजे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत त्याच चौकशी केली. त्यामध्ये घोटाळा झाल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आल्याने पोलिसांनी महापालिकेने या प्रकरणाची चौकशी करावी असे पत्र सप्टेंबर २०२२ मध्ये महापालिकेला पाठवले. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्याने व पोलिसांचे पत्र प्राप्त होण्यापूर्वीच दोन अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठित करण्यात आली होती.

सप्टेंबर महिन्यात या घोटाळ्याची कुणकूण कोणालाही लागू देण्यात आली नाही. खुद्द अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांना देखील या प्रकरणाची माहिती तीन दिवसांपूर्वी मिळाली. आरोग्य विभागातील अंतर्गत वाद, कर्मचाऱ्यांवर केली जाणारी कारवाई याची माहिती वारंवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जात असताना या प्रकरणाबाबत मात्र वरिष्ठांनाच अंधारात ठेवण्यात आले.

आरोग्य प्रमुख भारती म्हणाले, ‘पोलिसांचे पत्र येण्यापूर्वीच दोन अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्याचा अहवाल येत्या आठवड्यात प्राप्त होईल. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. ही चौकशी करताना त्यात मुदतीचा उल्लेख नव्हता. लवकरात लवकर चौकशी करून अहवाल सादर करावा असे सांगितले होते.

अतिरिक्‍त आयुक्त बिनवडे म्हणाले, या प्रकरणाची माहितीच मला शनिवारी कळाली आहे. या प्रकरणात पूर्वीच चौकशी समिती नेमली आहे. त्यामुळे आता वेगळी समिती नेमलेली नाही. पण या समितीचा अहवाल योग्य नसल्यास त्रयस्थ संस्थेमार्फत पुन्हा चौकशी केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT