PNE26W41032
मुंबई ः राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अनुराधा मिश्रा यांनी पाच सुवर्णपदके आणि पाच मानाच्या ट्रॉफी पटकावल्या.
अनुराधा मिश्रा यांची सुवर्ण कामगिरी
राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत यश
अहिल्यानगर, ता.८ ः शहरातील पॉवरलिफ्टर अनुराधा रत्नेश मिश्रा यांनी राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करत पाच सुवर्णपदके आणि पाच मानाच्या ट्रॉफी पटकावून अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मुंबईच्या गोवंडी येथे छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा २०२६ मध्ये त्यांनी विविध गटांमध्ये वर्चस्व गाजवत ‘स्ट्राँग वूमन ऑफ महाराष्ट्र’ या मानाच्या किताबांसह उल्लेखनीय यश संपादन केले.
ही स्पर्धा ॲम्युचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातील नामांकित पॉवरलिफ्टर्सनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या स्पर्धेत अनुराधा मिश्रा यांनी आपल्या ताकद, तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेत अनेक गटांत सुवर्णपदकांची कमाई केली. मिश्रा यांनी यापूर्वीही आशियाई पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते तुषार दारकर, सचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे आणि राष्ट्रीय पंच निशा शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.