पुणे

औंधमध्ये कुस्तीचा थरार; गादी-माती गटात 210 मल्लांची जोरदार झुंज

CD

औंधमध्ये कुस्त्यांचा थरार

गादी-माती गटात २१० मल्लांनी थोपटले दंड

औंध, ता. २ : येथील श्री यमाई मंगल कार्यालयात वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आज सुरुवात झाली. गादी आणि माती गटात होणाऱ्या स्पर्धेसाठी २१० मल्लांनी सहभाग नोंदविला आहे.

सातारा जिल्हा कुस्तीगीर संघ आणि अंकुश भाऊ गोरे युवा मंचने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. वरिष्ठ अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी आणि ग्रीकोरोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी होणार आहे. महिला महाराष्ट्र केसरीसाठी १० वजन गटातून २६ महिला कुस्तीगिरांनी सहभाग नोंदवला आहे. ग्रीकोरोमन महाराष्ट्र केसरीसाठी वजनगटातून ५६ मल्ल सहभागी झाले आहेत, तर महाराष्ट्र केसरी गादी गट ५० आणि माती गटात ७८ मल्ल सहभागी झाले आहेत. सकाळच्या सत्रात तांत्रिक समिती प्रमुख प्रा. अमोल साठे यांनी पंचांना मार्गदर्शन केले. यावेळी उद्योजक अंकुश गोरे, भारती गोरे, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, सचिव धनाजी पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ, हिंदकेसरी विकास जाधव, दादासाहेब इंगळे, शशिकांत मोरे, उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघम, बापूराव चव्हाण, शशिकांत जाधव, बापूसाहेब माने, साक्षी बनसोडे, नीलेश लोखंडे, जालिंदर राऊत, सुरेश थोरात, अधिक जाधव, शिवाजी जाधव, विकास गुंडगे, किसन आमले, संतोष भोसले, सनी इंगळे, आप्पा राजगे, शिवाजी राजगे उपस्थित होते. निवड चाचणीसाठी दोन मॅट (गादी) आखाडे आणि एक मातीचा आखाडा तयार करण्यात आला आहे. कुस्तीशौकीन यांना बसण्यासाठी स्वतंत्र गॅलरीची सोय करण्यात आली आहे. कुस्तीचा थरार पाहण्यासाठी परिसरातील कुस्तीशौकिनांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

A00652
औंध ः महाराष्ट्र केसरी ७९ किलो वजनगटातील आकाश माने (भोसे) विरुद्ध समाधान खांडेकर (म्हसवड) कुस्ती लावताना अंकुश गोरे. त्या वेळी भारती गोरे, धनाजी पाटील, संतोष वेताळ, दादासाहेब इंगळे आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

SCROLL FOR NEXT