pune.jpg
pune.jpg 
पुणे

खासगी सावकरकी मोडून काढणार : एपीआय दिलीप पवार

राजकुमार थोरात

वालचंदनगर(पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या खासगी सावकारांच्या विरोधात कडक मोहिम राबवून खासगी सावकारकी धंद्याचा बिमोड करणार असल्याची माहिती वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. जंक्शन (ता.इंदापूर) येथे वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. 

यावेळी पवार यांनी सांगितले की, ''इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये खासगी सावकरकीचे पेव फुटले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे सांगितले. दरम्यान, इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील लासुर्णे, बोरी, जंक्शन हे खासगी सावकारकीची प्रमुख गावे आहेत. एखाद्या व्यक्तीला पैसे देवून त्यावरती दर महिन्याला ५ ते २० टक्के व्याज आकारत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत आहे. तसेच गावातील मुख्य चौकामध्ये बसत असून सर्वसामान्य नागरिकांना पैशासाठी नाहक त्रास देतात. खासगी सावकरकांनी काही दलाल हाताशी धरुन सावकारकीचा व्यवसाय जोमाने सुरु करीत आहेत. काही सावकार सर्वसामान्य नागरिकांच्या कुंटूबाला ही नाहक त्रास देत आहे. अनेक सावकार व दलालांचे राजकीय संबध असल्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये सावकारांचा दरारा आहे.

गेल्या वर्षी इंदापूर तालुक्यातील गोतोंडी परीसरातील युवकाचा सावकारकीतून खुन झाल्याची घटना घडली होती. तसेच लासुर्णे व जंक्शन परीसरातील तीन-चार कुंटूबावरती  सावकारकीच्या जाचाला कंटाळून गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे.


तक्रार देण्याचे आवाहन
यासंदर्भात वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांच्या पाठामागे पोलिस प्रशासन खंबीरपणे उभे आहेत. खासगी सावकार पैशासाठी त्रास देत असल्यास तातडीने पोलिस ठाण्याशी संपर्क साधवा. तसेच इतर नागरिकांकडे खासगी सावकारकीची माहिती असल्यास (०२११८) २७२३५० या क्रमांकावरती फोन करुन द्यावी. फोन करणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT