Covid Patient App Sakal
पुणे

पुण्यात गृह विलगीकरण झालेल्यांकडून ‘ॲप’चा वापर नाही

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गृह विलगीकरणमध्ये (home separator) असणाऱ्या रुग्णांवर (Patients) देखरेख (Watch) करण्यासाठी महापालिकेने (Municipal) ‘अॅप’ (App) तयार केले खरे, परंतु बहुतेक रुग्णांनी हे अॅप मोबाईलमध्ये डाउनलोडच (Download) केले नाही, तर ज्यांनी केले त्यापैकी निम्म्या रुग्णांनी ते अॅक्टिवच केले नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. (app is not used by home separators patients in Pune)

कोरोनाची सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घरीच विलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्यांची संख्या ही जवळपास ९० टक्क्याच्या आसपास आहे. अशा रुग्णांनी घरातून बाहेर पडणे अपेक्षित नाही. परंतु काही रुग्णांकडून या अटीचे पालन होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना त्यांच्या मोबाईलवर ‘होम अयसालेशन अॅप’ डाउनलोड करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. परंतु, महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या माहितीनुसार २ हजार ४९६ जणांनी हे अॅप डाउनलोड केले, परंतु, त्यापैकी १ हजार ७२२ जणांकडे ते अॅक्टिव असल्याचे दिसून आले आहे. शहरात प्रतिदिन सापडणारे रुग्ण आणि प्रत्यक्षात सदर अॅप डाउनलोड करणाऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता, बाधित रुग्णांकडून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आसल्याचे समोर आले आहे.

तब्बल ५७ लाख दंड वसूल

नियम मोडणाऱ्यांकडून महापालिकेने आतापर्यंत एक कोटीहून अधिक रुपये दंड वसूल केला आहे. त्यामध्ये जिमखाना, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणे, मॉल आदी ठिकाणी केलेल्या पाहणीत नियमांचे उल्लंघन झालेल्या विविध १८ हजार ४६५ घटनांत महापालिकेने सुमारे ४९ लाख ५ हजार २९८ रुपये इतका दंड वसूल केला. तर मास्क न घालणाऱ्या सुमारे २२ हजाराहून अधिक जणांकडून एकूण ५७ लाख ८५ हजार १४० रुपये इतका दंड वसूल केला आहे.

सदर अॅप हे रुग्णाच्या प्रकृतीची माहिती मिळविणे, त्यानुसार त्याला उपचाराच्या सुविधा मिळवून देण्यासाठी पूरक ठरत आहे. त्यामुळे याचा अधिक वापर होम क्यॉरंटाइनमधील रुग्णांनी करणे आवश्यक आहे.

- डॉ. कल्पना बळिंवत, आरोग्य अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi speech Lok Sabha : होर्मुझमध्ये अडथळा कधीच...; लोकसभेत मोदींनी दिला स्पष्ट इशारा

IND vs AUS Test: भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेचा थरार, कांगारूंचा संघ वर्षभरात २० सामने खेळणार; पाहा वेळापत्रक

Gold Smuggling Case : 'या' अभिनेत्रीचं 100 कोटींचं 'गोल्ड कनेक्शन'; युगांडा ते दुबईपर्यंत पसरलेलं तस्करीचं जाळं उघड, ED च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

Latest Marathi News Live Update : सलग पाचव्या दिवशी SIT कडून गोपनीय ठिकाणी खरातची चौकशी सुरू

रेल्वेत टीसीच गैरवर्तन, प्रवाशाचं संतापून धक्कादायक कृत्य, मारहाण-धक्काबुक्की अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT