Appeal of Tehsildar of Indapur to Villagers who stayed near river
Appeal of Tehsildar of Indapur to Villagers who stayed near river  
पुणे

नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी वैष्णवांची काळजी घेण्याचे इंदापूरचे तहसीलदारांचे आवाहन

राजकुमार थोरात

वालचंदनगर - नीरा नदी पाणी असून नदीमध्ये ठिकाणी वाळूउपशामुळे खड्डे तयार झाले असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पालखी सोहळ्यातील वैष्णवांची काळजी घेवून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केले.

येत्या दोन दिवसामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये संत तुकाराम महाराज ,संत सोपनदेव महाराज, संत संतराज महाराज व इतर संताच्या पालखी सोहळे इंदापूर तालुक्यामध्ये येत आहेत. यातील संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सराटी मार्ग अकलुजकडे मार्गस्थ होणार आहे. हा सोहळा नीरा नदीच्या पुलावरुन जाणार आहे. तर संत सोपानदेव, संत संतराज यांचे पालखी सोहळे नदीकाठच्या कळंब, निमसाखर, निरवांगी गावामधून मार्गस्थ होणार आहेत. पालखी सोहळ्या दरम्यान अनेक वारकरी आघोंळीसाठी नदी काठ जात असल्याने ग्रामस्थांनी वारकऱ्यांना सहकार्य करावे. प्रत्येक गावालगतच्या नदीच्या पात्रामध्ये पाण्याच्या अंदाज घेवून दाेरी बांधावी. तसेच दोरीच्या पलीकडे वारकरी जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

दोरीच्या पलीकडील बाजूस छोटीशी बोट, ट्युब व पोहता येणारे तीन-चार युवकांची व्यवस्था करावी.तसेच पालखी मुक्कामच्या ठिकाणी आरोग्य,महावितरण, ग्रामसेवक, तलाठी व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे आप्तकालीन कार्यालय सुरु करावे. यामुळे अडचणीच्या काळी पालखीतील वैष्णवांना मदत करणे शक्य होणार आहे. तसेच पालखी तळालगतची वाळलेली झाडे तोडणे, विजेची व्यवस्था करताना चांगल्या दर्जाच्या केबलचा उपयोग करण्याचे आवाहन केले. निरवांगी गावामध्ये पालखीचा मुक्काम व सोहळ्यातील दिंडीची मुक्कामाची जागा वेगवेगळी असल्याने ग्रामस्थांनी पाण्याची व विजेची योग्य व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी ग्रामसेवक संजय भोसले, तलाठी मदन भिसे, सरपंच रेख माने, माजी सरपंच दत्तात्रेय पोळ, शंकर शेंडे, डाॅ. रमेश गायकवाड, मारुती रासकर, महेश रासकर उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT