पुणे - पाडव्यापासून मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देवस्थानांकडून दर्शनाच्या रांगेत सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासोबत भाविकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांना मास्क सक्तीचा राहील. काही मंदिरांमध्ये पूजेचे साहित्य स्वीकारण्यात येणार नाही. भाविकांच्या श्रद्धेचा आदर आहे; परंतु त्यांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे, असे आवाहन देवस्थानांच्या विश्वस्तांनी केले आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांना मास्क असेल तरच प्रवेश मिळणार आहे. रांगेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. सभा मंडपात बसता येणार नाही. गर्दी टाळण्यासाठी आणि भाविक लवकर दर्शन घेऊन बाहेर पडतील, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सारसबाग गणपती, रमणा गणपती, काळी जोगेश्वर मंदिर, कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती, मृत्युंजयेश्वर मंदिर, श्री राम मंदिर या ठिकाणी पहाटेची पूजा सुरू करण्यात येणार आहे. मंदिरात ग्रुपने येणाऱ्यांना दर्शन नाही. मंदिरात तीर्थप्रसाद दिला जाणार नाही. पूजेचे साहित्य स्वीकारण्यात येणार नाही, असे श्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नाही. सरकारच्या निर्देशानुसार देवस्थान, प्रार्थनास्थळांच्या विश्वस्तांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन करावे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंदिर देवस्थानकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. भाविकांच्या श्रद्धेचा आदर असून, त्यांनी स्वयंशिस्त पाळावी. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरसह नियमांचे पालन करावे, असे भाविकांना विनम्र आवाहन आहे.
- सुधीर पंडित, प्रमुख विश्वस्त, श्री देवदेवेश्वर संस्थान
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारच्या निर्देशांचे काटेकोर पालन करणार आहोत. आराध्य दैवतेचे दर्शन करण्यासाठी भाविक आतूर आहेत. भाविकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. पाडव्याचा मुहूर्त असल्यामुळे भाविकांना पूजेचे साहित्य आणण्यावर बंदी ठेवता येणार नाही. दुसऱ्या टप्प्यात भाविकांसाठी अभिषेक आणि सभा मंडप सुरू करण्यात येईल.
- महेश सूर्यवंशी, कोशाध्य, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
मंदिरे ही भाविकांसाठी चैतन्यस्त्रोत आहेत. मंदिरात येणाऱ्या भाविकांवर पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्यांसह अनेकांची उपजीविका असते. त्याला खिळ बसली होती; परंतु पाडव्याच्या मुहूर्तावर ही मंदिरे खुली झाल्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.
- ऍड. शिवराज कदम जहागिरदार, अध्यक्ष, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट
भाविकांच्या दर्शनासाठी बॅरिकेड्स असून, त्यासाठी स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा आहे. भाविकांनी पूजेचे साहित्य आणू नये. सोमवारी कोराना योद्ध्यांच्या हस्ते महाभिषेक करून मंदिर खुले करण्यात येणार आहे. पाडव्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्यात येईल.
- ऍड. प्रताप परदेशी, विश्वस्त, महालक्षमी मंदिर ट्रस्ट
धार्मिकस्थळे खुली करण्याबाबत आदेश आला आहे. त्यामुळे सोमवारपासून मशिदी खुल्या होतील. राज्य सरकारने कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. स्वच्छता, सॅनिटायझेशनला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर ठेवावे.
- रफीउद्दीन शेख, सचिव, सीरत कमिटी पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.