Maha DBT sakal
पुणे

शिष्यवृत्ती योजनांसाठी Maha DBT पोर्टलवर ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे उच्च शिक्षण विभागाच्या १४ शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाइनद्वारे अंमलबजावणी करण्यात येते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध १४ शिष्यवृत्ती योजनांसाठी ३१ मार्चपर्यंत महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे. राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे उच्च शिक्षण विभागाच्या १४ शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाइनद्वारे अंमलबजावणी करण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनांबाबत ‘https://mahadbtmahait.gov.in’ संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे.

त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक साहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य योजना (कनिष्ठ स्तर) व (वरिष्ठ स्तर), राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती, राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग-2), माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक साहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक साहाय्य या योजनांचा समावेश आहे. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी मुदतपूर्व या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन उच्च शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident in Kolhapur : कोल्हापुरात भीषण अपघात भरबाजारात घुसले वडाप, एका महिलेचा मृत्यू, दोन महिला गंभीर

Abhishek Sharma New Car : अभिषेक शर्माने घेतली नवी 'Ferrari Purosangue', किंमत अन् फिचर्स ऐकून डोळे पांढरे होतील...

Latest Marathi News Live Update : पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन

पुण्यात PMPL बसची दुचाकीला मागून धडक, तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

US Visa Policy: गोंधळ ओसरला, मात्र धाकधूक कायम! अमेरिकेच्या ‘एच-वन-बी व्हिसा’बाबत आयटीयन्सची परिस्थिती

SCROLL FOR NEXT