sharad pawar and baba adhav.jpg 
पुणे

शरद पवार व डॉ. बाबा आढाव यांच्या भेटीत झाली 'या' विषयांवर चर्चा 

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : राज्याचे माथाडी सल्लागार मंडळ तातडीने नियुक्त करावे. राज्यातील कामगार विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत. तसेच सर्व महसूल विभागातील कामगार प्रतिनिधींना प्रतिनिधीत्व मिळावे, आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांना दिले. 

बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आढाव यांनी चर्चा केली. यावेळी, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे उपस्थित होते. राज्यातील तोलणारांबाबत सुनिल पवार समितीचा अहवाल स्विकारावा तसेच राज्यशासनाने महाधिवक्ता यांचेमार्फत बाजू मांडून तोलणारांचा रोजगार वाचवण्यात यावा. राज्यातील शासकीय धान्य गोदामातील कंत्राटी पध्दत बंद करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माथाडी मंडळे जीएसटीमधून वगळावीत. माथाडी मंडळाने हप्त्याची कपात पूर्वीप्रमाणे करावी याबाबतचे आदेश राज्यशासनाने त्वरीत काढावे. कष्टकर्‍यांना आपतकालीन स्थितीत विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे,  हमालांच्या मजुरीमधून टीडीएस कपात केला जावू नये याखेरीज मालधक्क्यावर कामगारांसाठी किमान नागरी सुविधा असाव्यात तसेच पुणे रेल्वे स्टेशन येथील मालधक्का पुर्ववत सुरू करण्यात यावा आदी मागण्या निवेदनाद्वारे पवार यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

SCROLL FOR NEXT