Pune ZP Sakal
पुणे

कोरोना बाल रुग्णांसाठी १०८ बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांची कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची कमतरता भासू नये, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने आतापासूनच पूर्वतयारी सुरू केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेत (Third Wave) बालकांची (Child) कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास, त्यांच्यावर उपचार (Treatment) करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची (Pediatricians) कमतरता भासू नये, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने आतापासूनच पूर्वतयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाभरात ९९ अर्धवेळ आणि नऊ पूर्णवेळ अशा एकूण १०८ बालरोगतज्ज्ञांची मानधन (Honorarium) तत्त्वावर नियुक्ती केली आहे. हे सर्व बालरोगतज्ज्ञ खासगी रुग्णालयांतील आहेत. या सर्वांना ससून रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ.आरती किणीकर यांच्याकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. (Appointment of 108 Pediatricians for Corona Pediatric Patients)

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पूर्वीपासून पूर्णवेळ किंवा अर्धवेळ बालरोगतज्ज्ञ उपलब्ध नाहीत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत शून्य ते अठरा वयोगटातील बालके आणि मुलांना जास्त संसर्ग होण्याचा धोका असल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या अंदाजानुसार लहान मुलांची कोरोना रुग्ण संख्या वाढलीच तर, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बालरोगतज्ज्ञ उपलब्ध असावेत, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय लहान मुलांसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी एक स्वतंत्र समर्पित कोविड आरोग्य रुग्णालये (डीसीएच) कार्यान्वित केले जाणार आहे. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एक पूर्णवेळ बालरोगतज्ज्ञ उपलब्ध असणार आहे. या बालरोगतज्ज्ञांना अर्धवेळ बालरोगतज्ज्ञ मदत करतील, असे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे. नियुक्त करण्यात आलेल्या या तज्ज्ञांना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान निधीतून मानधन दिले जाणार आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व सर्वोत्कृष्ट बाल रुग्णालये आणि नर्सिंग होम्सना (केंद्र) समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) म्हणून मान्यता दिली जाणार आहे.

आरोग्य यंत्रणेची स्थिती व बालकांची संख्या

- जिल्हा रुग्णालय --- ०१

- उपजिल्हा रुग्णालये --- ०५

- ग्रामीण रुग्णालये --- १९

- प्राथमिक आरोग्य केंद्र --- ९७

- तीन ते अठरा वयोगटातील मुले --- १३ लाख ४३ हजार ५४२

- शून्य ते तीन वयोगटातील मुले --- १ लाख २४ हजार

- पुढील तीन महिन्यात जन्म घेणारी संभाव्य बालके --- २४ हजार ३८४

- सहा महिने वयाच्या आतील बालके --- ३१ हजार ६३८

जिल्ह्यातील सर्व समर्पित कोविड आरोग्य केंद्र, समर्पित कोविड रुग्णालयांतील १० टक्के बेड (खाटा) बालकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय खासगी बाल रुग्णालये आणि नर्सिंग होम्सनाही समर्पित कोविड आरोग्य केंद्र म्हणून मान्यता दिली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण असलेल्या लहान मुलांवर उपचारासाठी अडचण येणार नाही.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT