corona 
पुणे

पुरंदरमधील गर्दीवर या उपायामुळे बसणार लगाम 

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : कोरोनाच्या "रेड झोन'मधील पुणे पुरंदर तालुक्‍यातील गावांना अगदी जवळ आहे. त्यातून परिसरात कोरोनाबाबत धोका आहे. त्यामुळे तालुक्‍याचे मुख्य ठिकाण असलेल्या सासवड शहरात खरेदीसाठी येणारी गावोगावची गर्दी रोखण्यासाठी तालुक्‍यातील गावांनीच त्वरित "ग्रामदूत' नेमावेत. त्यांच्याशिवाय तालुक्‍याच्या बाजारपेठेत कोणत्याही जीवनावश्‍यक वस्तू मिळणार नाहीत, असे तहसीलदार रूपाली सरनौबत यांनी स्पष्ट केले. 

पुरंदर तालुक्‍यातील गावोगावचा प्रत्येकजण सासवड या तालुक्‍याच्या गावाला खरेदीसाठी येतो आणि सोशल डिस्टन्सिंगला अर्थ राहत नाही. ध्वनिक्षेपकावर वारंवार सूचना करूनही गर्दीचा प्रकार घडतोय. त्यामुळे गावोगावच्या ग्रामपंचायतींनी रीतसर नोंदणी करून गावच्या कुटुंबनिहाय यादी घेऊन खरेदीसाठी व इतर कामांसाठी "ग्रामदूत' नेमावेत, असे आदेश तहसीलदार सरनौबत यांनी दिले. ग्रामदूतास तलाठी, ग्रामसेवक यांनी तालुका प्रशासनाशी चर्चा करून दिवस व वेळा ठरवून द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पोलिस यंत्रणा या ग्रामदूतांशिवाय इतर कोणालाही जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीला सासवड व तालुक्‍यातील इतर शहरी भागात फिरकू देणार नाहीत. असा विनापरवाना कोणी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. "ग्रामदूत' प्रतिनिधी नोंदवून ग्रामपंचायतीकडून कार्यवाही तातडीने अपेक्षित आहे. जेजुरी, नीरा व मोठ्या गावांबाबतही हा नियम राहील. शहरातील नागरिकांना तर घरपोच जीवनावश्‍यक वस्तूंची सेवा ठेवली आहे. त्याचा वापर नीट होण्याबाबत नगरपालिकांनी अजून लक्ष देण्याचे गरज आहे. संचारबंदीत नियम न पाळल्यास संबंधितांवर कडक कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई नको असेल; तर गावात व त्यातही घरीच रहा. शेतीचे कामे सोशल डिस्टन्सिंग ठेवून करा, असेही तहसीलदार सरनौबत यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT