muslim.jpg 
पुणे

पुणे : मुस्लिम बांधवांनी केले हिंदू व्यक्तीवरती हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार 

सकाळवृत्तसेवा

वारजे :  वारजे येथील गोकुळनगर पठारावरती  रविवारी रात्री श्रावण कांबळे (वय 65) यांचे निधन झाले. घरांमध्ये फक्त त्यांची बहीण होती. मात्र दुसरे कोणी नातेवाईक नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. हे पाहून येथे असणाऱ्या मुस्लिम समाजाच्या मुलांनी त्यांचा अंत्यविधी हिंदू पद्धतीने पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे केला.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ नगर पठारावरती श्रावण कांबळे व त्याची बहीण  पुष्पा कांबळे हे दोघे एका खोलीमध्ये राहत होते. रविवारी रात्री श्रावण कांबळे यांचे  निधन झाले. त्यांची बहीण फक्त घरामध्ये होती. त्यांना दुसरे कोणते नातेवाईक  नसल्याने अंत्यविधी कसा करायचा असा प्रश्न या बहिणीपुढे  उभा राहिला. त्याच वेळी येथे असणारे रफीक शेख यांनी सामाजिक कार्यकर्ते आलम पठाण यांना संपूर्ण माहिती दिली.

दरम्यान, त्यानंतर लगेच पठाण यांनी रुग्णवाहिकेला फोन करून मृतदेह ससून रुग्णालयात नेला. सोमवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर ताब्यात  घेतला. घरामध्ये नातेवाईक कोणीच नसल्याने कांबळे यांचा अंत्यविधी कसा करायचा असा प्रश्न कांबळे यांच्या बहिणीला पडला होता. मात्र या मुस्लिम बांधवांनी हिंदू रूढीप्रमाणे वैकुंठ स्मशानभूमीत स्वतः सगळ खर्च करून अंत्यविधी पूर्ण केला.

यावेळी मुस्लिम समाजाचे आलम पठाण, रफिक शेख, मोहम्मद शेख, आसिफ सय्यद हे मुस्लिम बांधव तर कांबळे यांची बहीण पुष्पा कांबळे यांच्या उपस्थितीत अंत्यविधी पूर्ण केला.

कांबळे कुटुंब वारजे माळवाडीतील गोकुळ नगर पठार येथे राहतात. त्यांची परिस्थिती अतिशय गरीब असल्या कारणाने व कोरोनाच्या भीतीने हा अंत्यविधी करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. मात्र आम्ही सामाजिक भान राखून श्रावण कांबळे यांच्यावरती वैकुंठ स्मशानभूमी मध्ये सर्व परवानग्या घेऊन अंत्यविधी पूर्ण केला.

- आलम पठाण, सामाजिक कार्यकर्ते 

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT