Crackers Permission sakal
पुणे

Crackers Permission : फटाका विक्री परवान्याचे नूतनीकरण करण्यास मान्यता

अयोध्येमध्ये श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जात असताना देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अयोध्येमध्ये श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जात असताना देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. याच निमित्ताने शहरात १६ ते २३ जानेवारी या कालावधीत फटाका विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना खासगी तसेच सार्वजनिक जागेवर फटाका स्टॉल लावण्यासाठी परवान्यास मुदतवाढ दिली जाणार आहे. यासंदर्भात अपर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सर्व पोलिस ठाण्यांना आदेश दिले आहेत.

फटाका डीलर्स वेल्फेअर असोसिएशनच्या सचिव शिल्पा भोसले यांनी यासंदर्भात पोलिस आयुक्त रितेश कुमार, महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले होते. अयोध्येमध्ये २२ जानेवारीरोजी श्रीरामाच्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे.

यानिमित्ताने देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे पुणे शहरात फटाका विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना खासगी व सार्वजनिक जागेवर तात्पुरत्या स्वरुपाचा परवाना मिळावा अशी मागणी भोसले यांनी केली होती. त्यानुसार अपर आयुक्त चावरिया यांनी आदेश काढले आहेत.

शहरातील सर्व पोलिस ठाण्यांनी दिवाळीसाठी नोव्हेंबर महिन्यात तात्पुरता फटाका स्टॉल परवाना मंजूर केला आहे. त्यानुसार या परवान्यांना १६ जानेवारी ते २३ जानेवारी या कालावधीत मुदतवाढ द्यावी. तसेच यावेळी योग्य त्या अटी व शर्ती कायम ठेवून नूतनीकरण केले जावे असे चावरिया यांनी आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT